विदर्भात काही भागांत हलक्या पावसाचा इशारा

0

राज्यात सध्या सर्वाधिक तापमानामुळे उन्हाच्या सर्वाधिक झळा जाणवत असलेल्या विदर्भातील काही भागांत १० मार्चपासून दोन ते तीन दिवस हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात या काळात तापमानवाढ कायम राहणार अशी महती देण्यात आली आहे.

राज्याकडे येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांच्या पुढे नोंदविला गेला आहे. विदर्भात काही भागांत ४० अंशांपुढे कमाल तापमानाची नोंद होत आहे. बहुतांश भागांत रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाल्याने रात्री उकाडा जाणवत आहे.

विदर्भात १० मार्चपासून तीन दिवस या विभागांत काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा आदी जिल्ह्य़ांमध्ये पावसाची शक्यता आहे.

पुणे, जळगाव, सातारा, सांगली, सोलापुरात कमाल तापमान ३६ ते ३८ अंशांवर आहे. मुंबई परिसरातील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वाढून ३५ अंशांवर गेला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ३७ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.

महत्वाच्या बातम्या : –

कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता

करडांना जपा शेळीपालन करून आता शेतकरी कमवू शकतात दुप्पट नफा

अग्निशिखा /कळलावी या नावाने ओळखली जाणारी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती

शेतकऱ्यांसाठी धावून आले अजितदादा, केल्या मोठ्या घोषणा

गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने बंद, हजारो क्विंटल धान उघड्यावर

 

Leave a comment