नागपुरात किमान ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असा संपला असे वाटत असताना, निसर्गाने परत एकदा ‘यू टर्न’ घेतला आहे. दरम्यान गेल्या २४ तासात नागपूरमध्ये ९.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. २४ तासातच पाऱ्यामध्ये ४.७ अंश सेल्सिअस इतकी घसररण झाली.
सोमवारी पहाटे पारा आणखी घसरला व नागपुरात किमान ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २४ तासात अचानक पारा घसरल्याने बोचरी थंडी जास्त जाणवत होती. सरासरीहून हे किमान तापमान ५.३ अंश सेल्सिअस कमी होती.
दुसरीकडे कमाल तापमानात देखील घट झाली असून २८.६ अंश इतके तापमान नोंदविल्या गेले. कमाल तापमानदेखील सरासरीहून २.१ अंश सेल्सिअस कमी होते. सोमवारी नोंदविण्यात आलेले यंदाचे हे पाचव्या क्रमांकाचे सर्वात कमी तापमान होते. त्यामुळे विदर्भातदेखील काही ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवणायत आले आहे .
मागील काही दिवसापासून किमान तापमान १० अंशाहून अधिकच नोंदविल्या जात होते. शिवाय कमाल तापमानातदेखील वाढ होत असल्याने दिवसा काही प्रमाणात गरमीदेखील जाणवत होती.
महत्वाच्या बातम्या : –
बडीशेप लागवडीतून राजस्थानचा ‘सौफ किंग’ कमावतो 25 लाख रुपये
पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी शासनाने 16000 कोटी रुपयांचे केले वाटप
डाळिंबाच्या फुलसमस्येवर हे आहेत नैसर्गिक जैविक सेंद्रिय उपाय