नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात

0

नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला लागला आहे. सर्व जिल्ह्यात तापमानात काहीअंशी चढ-उतार हाेत. असे असले तरी पारा सामान्यापेक्षा ३ ते ५ अंशाने अधिकच आहे. दिवसा कडक उन्हाचे चटके बसत आहेत, तर रात्री मात्र नागपूरकरांना हलकी थंडी जाणवत आहे.

विदर्भातील काही जिल्ह्यात शुक्रवारी म्हणजेच ५ मार्च २०२१ रोजी काही भागांमध्ये तापमानात वाढ तर  काही भागांमध्ये घट नाेंदविण्यात आली. चंद्रपूरमध्ये ०.४ अंशाची वाढ हाेत पारा ३९.६ अंशाच्या उच्चांकावर पाेहचला आहे. येथील तापमान पाच दिवसात ४० अंशापर्यंत पाेहचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नागपूरमध्ये ०.१ अंशाची वाढ हाेऊन पारा ३७.८ वर पाेहचला. अकाेल्याचे तापमान ३९.१ अंशावर कायम आहे. ब्रह्मपुरीमध्ये मात्र एका अंशाची घट झाली व तापमान ३८.८ वर आले.वाशिममध्ये १.४ अंशाची घट हाेत पारा ३६ अंशावर खाली आला. वर्धा ०.७ अंशाने वाढत ३८.२ अंशाची नाेंद करण्यात आली. यवतमाळमध्ये कमाल तापमानात कालपेक्षा ३.७ अंशाची सर्वाधिक वाढ नाेंदविण्यात आली व तापमान ३८.७ अंशावर पाेहचले.  इतर जिल्ह्यामध्ये अमरावती ३७.८, बुलडाणा ३७.२, गडचिराेली ३६.४, गाेंदिया ३५.२ अंशाची नाेंद करण्यात आली.

नागपूरमध्ये दिवसा उन्हाने चिडचिड हाेत असली तरी रात्री मात्र नागपूरकरांना गारव्याची जाणीव हाेते. दरम्यान, वाढते तापमान लक्षात घेता शेतातील पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठिकाणी साठविण्याचे आवाहन हवामान विभागाने शेतकऱ्यांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या : –

रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे

काकडी पीक व्यवस्थापन

तेजपानचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, एकदा वाचाच

रासायनिक शेतीचे दुष्परीणाम

आसाम चहाशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी वाचा

Leave a comment