विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली

0

हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सरासरी तापमान ३८ ते ३८.८ अंशाच्या जवळपास जाणार अशी माहित देण्यात आली आहे.

दरम्यान गेल्या २४ तासात चंद्रपूर आणि अकोल्यात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले. चंद्रपुरात ३९.४ तर अकोल्यात ३९.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर शहरातील तापमान ३७.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.

शहरातील आर्द्रतेमध्येही मोठ्या प्रमाणावर घट नोंदविण्यात आली. सकाळी आर्द्रता ३७ टक्के होती. ती सायंकाळी घटून १७ टक्क्यांवर आली. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत होता.

नागपुरातील भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, ६ मार्च ते १० मार्च दरम्यान आकाश निरभ्र राहील, असा अंदाज आहे. हवामान कोरडे, कमाल तापमान ३८ ते ३८.८ अंश सेल्सिअस, किमान तापमान १७.५ ते १९.५ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. तापमानात होणारी वाढ लक्षात घेता, जनावरांना हिरवा चारा, पिण्यास थंड व स्वच्छ पाणी द्यावे तसेच सावलीच्या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करावी, यासह अनेक सूचना देण्यात आल्या आहेत व या सूचनेचे पालन कर्वे अशी विनंती देखील नागरिकांना करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

लाल मिरचीचे भाव घसरण्याची शक्यता, व्यापाऱ्यांची लगबग सुरू

मिरची खत व्यवस्थापन

धान्य साठवणुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाययोजना

कोरोना काळातही शेती क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित

Leave a comment