नागपुरात ‘या’ दिवशी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

0

येत्या १६ फेब्रुवारी आणि १७ फेब्रुवारी २०२१ रोजी विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेणार असल्याने शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या पिकाबाबत सतर्कता बाळगण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मात्र, साेमवारी  ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंद महासागरात तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन पुढे वाढत बंगाल उपसागराच्या दक्षिण भागाकडे वाढत चालले आहे. त्यामुळे विदर्भ, कर्नाटक व मराठवाड्याच्या भागात समुद्र सपाटीपासून ०.९ किमीवर एक कुंड तयार हाेत आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला आकाशात ढग दाटण्याची व १६ फेब्रुवारी आणि १७ फेब्रुवारी २०२१ रोजी  विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.

उशिरा पेरणी केलेल्या रब्बी हंगामातील पिकास आवश्यकता नसल्यास ओलीत करणे पुढे ढकलावे. पाऊस होण्याची शक्यता असल्याने परिपक्व झालेल्या हरभरा, जवस, गहू, ज्वारी, मका, करडई, तूर आणि इतर पिकांची तत्काळ काढणी व मळणीची कामे करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाची वेचणी राहिली असल्यास लवकरात लवकर वेचणी करावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने शेतात काम करीत असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याची सूचना ग्रामीण कृषी मौसम सेवा, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर व प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिली आहे.

दरम्यान, नागपुरात दिवसाचे कमाल तापमान ३२.७ अंश नाेंदविण्यात आले जे १.४ अंश अधिक आहे. रात्रीच्या तापमानात १.३ अंशाच्या घटीसह १४.२ अंश नाेंद करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या : –

गोमुत्र हे मानवी शरीरासाठी जितके चांगले तितकेच शेतीसाठीही महत्वाचे

आंबा मोहोर संरक्षण

मिरची वरील मर रोगावर उपाय

जायद हंगामात भेंडीची लागवड करण्याची पद्धत

जाणून घ्या लेमनग्रासचे काही आश्चर्यकारक फायदे

Leave a comment