राज्यात अनेक ठिकाणी ‘या’ तीन दिवस पावसाची शक्यता

0

एकीकडे राज्यात कोरोना या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची  शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे . मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

येत्या गुरुवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर १७ मार्चला काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तर १८ तारखेला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूरसह वर्धा, गोंदिया, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात १७ मार्चला तुरळक पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सर्वच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पश्चिमी चक्रीवादळामुळे राज्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्याचवेळी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.राजधानी दिल्लीत 17 ते 19 मार्च दरम्यान वादळासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या : –

माती परीक्षणाचे नेमके काय फायदे आहेत तुम्हाला माहित आहे का ?

‘या’ दिवशी विदर्भात पावसाचा इशारा, विजांसह पावसाची शक्यता

लखनऊमध्ये उघडले हर्बल संग्रहालय

मेरा रेशन अ‍ॅपद्वारे आता घरी बसून तुम्हाला किती रेशन मिळेल हे ‘अश्या’ प्रकारे तपासा

जाणून घ्या का आहेत काकडीची साले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर

Leave a comment