तुम्ही विचारही केला नसेल कधी पण उसाचा रस देतो इतके फायदे, एकदा नक्की वाचा

0

उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाचं असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे. उसाचा रस फक्त तुमचा गर्मीपासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासूनही दूर ठेवतो. उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.

उसाचा रस हा एक अतिशय स्वस्थ आणि फायदेशीर पेय आहे. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक तत्त्वे असतात. ते हाडे मजबूत करतात आणि दातांची समस्या देखील कमी करते. त्याचबरोबर, या रसात कर्करोग आणि मधुमेह सारख्या प्राणघातक रोगांशी लढण्याची शक्ती देखील असते.

काही लोकांना उसाच्या रसातील हा गोडवा फारसा आवडत नाही. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात आणि कोलड्रिंक्‍सकडे वळतात. मात्र, कोल्ड्रिंक्‍समध्ये असणारे केमिकल आपल्या शरीराला हानीकारक असतात. याउलट उसाच्या रसामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे पोषक असतात. गर्भवतींसाठी हे खूप उपयोगी आहे. उसाचा रस फक्त गर्मीपासून बचाव करीत नाही तर बऱ्याच आजारपणापासून दूर ठेवतो. उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशनची भीती सतत असते. उसाचा रस पिल्याने डीहायड्रेशनपासून बचाव होतो. आज आपण या लेखात उसाचे रस पिण्याचे काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.

उसाचा रस पिण्याचे फायदे….

१. कृत्रिम थंड पेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खूप आहेत. याउलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

२. उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

३. कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्यास कावीळ लवकर बरी होण्यास मदत होते.

४. उन्हाळ्यात डिहायड्रेशनची भीती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डीहायड्रेशन पासून बचाव होतो.

५. उसाचा रस खोकला, दमा, मुत्ररोग आणि किडनीशी संबधित रोगांवरदेखील फायदेशीर आहे.

६. उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधीपासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. यामुळे दातांना होणाऱ्या इनफेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

७. उसाचा रस कावीळ या रोगांवर अत्यंत गुणकारी आहे. कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे फायदेशीर आहे.

८. उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्किनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

९. उसाचा रस ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. यात ग्लूकोजची अधिक मात्रा असून याला एक उत्तम एनर्जी ड्रिंक बनवतं. यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करुन शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

१०. उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहांनांपासून ते वयोवृद्धापर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त १-४ वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्यांच्या अडचणीत भर, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

सर्दी-खोकल्यापासून, वजन कमी करण्यापर्यंत करवंद खाण्याचे असंख्य फायदे….

दिल्ली सीमेवर पक्की घरे बांधल्यानंतर आता शेती केली जाईल, जाणून घ्या यामागील कारण

विदर्भातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतपिकांचं मोठं नुकसान

कारंजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता

 

Leave a comment