गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने बंद, हजारो क्विंटल धान उघड्यावर

0

आदिवासी विकास महामंडळ आणि पणन महासंघच्या ४२३ धान खरेदी केंद्रांवर नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किमतीप्रमाणे सुमारे ५८ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. फेब्रुवारी २०२१ मध्ये गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने बंद करण्यात आली. हंगाम संपत आला असला तरी या दाेन्ही शासकीय संस्थांनी धान भरडाई सुरू केली नाही. त्यामुळे हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे.

४२३ खरेदी केंद्रांपैकी पणन महासंघाची २४१, तर आदिवासी विकास महामंडळाची १८२ खरेदी केंद्रे आहेत. सर्वाधिक २६ लाख क्विंटल खरेदी भंडारा जिल्ह्यात करण्यात आली. त्यामुळे अनेक नाेंदणीकृत शेतकऱ्यांकडील धानाचे अद्यापही माेजमाप करण्यात आलेले नाही. हा प्रकार आणखी किती दिवस सुरू राहणार, असा प्रश्न धान उत्पादकांनी उपस्थित केला आहे.

धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बाेनस देण्याची घाेषणा शासनाने केली हाेती. या ७०० रुपयांमध्ये २०० रुपये सानुग्रह अनुदान आहे. यासाठी ५० क्विंटलची मर्यादा आहे. बहुतांश शेतकऱ्यांना चुकारे अद्याप मिळालेले नसताना बाेनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एप्रिलनंतर जमा करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या : –

महिंद्राच्या जाहिरातीची जोरदार चर्चा, एकदा व्हिडीओ नक्की पाहा

लहान बोर खाण्याचे मोठे फायदे जाणून घ्या

पंतप्रधान किसान योजनेत मोठा बदल, ही माहिती नक्कीच वाचा

उसाची शेती सोडून शेतक्यांनी सुरु केली केळीची लागवड

विदर्भातील वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणावर घटली

Leave a comment