प्रभावी किडनाशक लमित तयार करण्याची पध्दत जाणून घ्या
लमित तयार करण्याची पध्दत (लसूण + मिरची + तंबाखू)
२ किलो गावरान लसूण घेऊन तो गोणपाटाने चांगला चोळून काढावा मिक्सरमधून बारीक करून घ्यावा.
एका प्लास्टिक बकेट मधे अर्धा लीटर रॉकेल टाकून तो रात्रभर भिजवावा .
अर्धा किलो हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करून वेगळ्या प्लास्टिकच्या भांड्यात १ लिटर पाणी टाकून त्यात ती भिजवावी .
अर्धा किलो तंबाखूचा चूरा एक लीटर पाण्यात रात्रभर प्लास्टिकच्या भांड्यात भिजवावा.
वेगवेगळया भांडयात भिजत ठेवलेले मिश्रण दुसऱ्या दिवशी एकत्र मिसळावे .
त्यात – २० ग्रॅम हिंग व१०० ग्रॅम साबणाचा चूरा व २५०मिली गोमुत्र टाकून २४ त्तास भिजत ठेवावे .
नंतर गाळून तयार झालेला लमित अर्क १००मिली प्रति १oलीटर पाण्यात टाकून फवारणी करावी .
वापर कालावधी :-
३महीने ( लमित अर्कच्या वापराने सर्व प्रकारच्या किडींचा नाश होतो. )
लेखण –
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर.
B.Sc.Agri,M.Sc.Food Science & Tech.,P.G.D in Agri.Business.
संस्थापक अध्यक्ष,
तेजदिप शेतकरी,कृषी व कृषी पदविधर विकास संस्था,उंडाळे,ता.कराड, जि.सातारा.
मो.नं- 9021025147
महत्वाच्या बातम्या : –
वांगी पिकातील मर रोग व शेंडे अळी
सुर्यफूल लागवडीची संपूर्ण माहिती
खरबुज लागवड बद्दल आधुनिक माहिती
जाणून घ्या उन्हाळी बाजरी लागवड बद्दल संपूर्ण माहिती