17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजना लागू

0

‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ या योजनेअंतर्गत एकाच रेशन कार्डचा वापर देशभरात कुठेही करता येणार आहे. कोणत्याही राज्यातील रेशन कार्डधारक, कोणत्याही अन्य राज्यातील रेशनच्या दुकानातून कमी किंमतीत स्वस्त धान्य खरेदी करु शकतात. या योजनमुळे भ्रष्टाचारावर लगाम बसेल. तसंच रोजगार किंवा इतर कोणत्याही कारणास्तव एका ठिकाणाहून, दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या गरीबांना रेशन नाकारलं जाणार नाही, यापासून त्यांना वंचित राहावं लागणार नाही.

दरम्यान, आता देशातील 17 राज्यात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ हि योजना लागू करण्यात आली आहे, असे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. या योजनेत आता उत्तराखंड नाव हे ताजे आहे. ज्या राज्यांनी योजनेसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणांची पूर्तता केली आहे, ते राज्य आपल्या ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्टच्या  0.25 टक्क्यांपर्यंतच्या अतिरिक्त कर्जासाठी पात्र ठरतील. या योजनेअंतर्गत रेशनकार्डधारक देशातील कुठल्याही रेशन दुकानातून आता  आपल्या हक्काच्या  रेशनचा हिस्सा घेऊ शकतात.

एका निवेदनात मंत्रालयाने असे स्पष्ट केले आहे कि, या राज्यांना डिपार्टमेंट ऑफ एक्सपीडेंचरद्वारे 37,600 कोटी रुपयांचे अतिरिक्त कर्ज घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ योजनेच्या अंमलबजावणीमुळे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आणि इतर कल्याणकारी योजना, विशेषत: स्थलांतरित कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी, देशातील कोठेही उचित किंमत दुकानात लाभार्थ्यांना रेशनची उपलब्धता सुनिश्चित केली गेली आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आवश्यक असलेल्या स्त्रोताची आवश्यकता लक्षात घेता, भारत सरकारने 17 मे 2020 रोजी राज्यांच्या कर्ज घेण्याची मर्यादा त्यांच्या जीएसडीपीच्या 2 टक्के वाढविली होती.

या योजनेअंतर्गत होणारे फायदे –

– या योजनेचा सर्वाधिक फायदा गरीबांना होणार आहे
– एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्याऱ्यांना फायदा होईल
– बनावट रेशन कार्ड तयार करण्यावर रोख लावण्यात येईल
– सर्व रेशन कार्ड आधार कार्डशी जोडण्यात येण्याची आणि पॉइंट ऑफ सेल मशीनद्वारे धान्याचं वितरण करण्याची व्यवस्था लवकर सुरु होईल
– 85 टक्के आधार कार्ड पॉइंट ऑफ सेलशी जोडण्यात आले आहेत.
– 22 राज्यांमध्ये 100 टक्के पीओएस मशीन लावण्यात आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

अबब..! जंगली गव्यांना दररोज पाव खायला देणं पडलं महागात

जनावरांची तहान भागवण्यावरही होतोय आक्षेप, काय आहे नेमक प्रकरण ? वाचा सविस्तर..

उपवासाला का खातात वरईचा भात? काय आहेत फायदे?

रासायनिक खतांमधील भेसळ कशी ओळखावी ? वाचा सविस्तर

हळदीचे किती सेवन करावे आणि काय आहेत त्याचे फायदे एकदा नक्की वाचा

Leave a comment