
तब्बल १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले साैरकृषीपंप
शेतकऱ्यांना साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केली हाेती. एक वर्ष या याेजनेचे नियाेजन करण्यातच गेले. त्यानंतर मागील वर्षीपासून साैरकृषीपंप लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला. त्यानंतर आतापर्यंत जिल्हाभरात एकूण १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावण्यात आले आहे. सिंचन विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा हाेण्यासाठी साधन असने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषी पंपासाठी विज जाेडणी दिली जात हाेती.
काही शेतकऱ्यांचे शेत मुख्य वीज वाहिनीपासून बऱ्याच दूर अंतरावर राहत असल्याने वीज जाेडणी देणे शक्य हाेत नाही. तसेच बरीचशी वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून दिली जात हाेती. या सर्व अडचणींपासून सुटका करण्यासाठी शासनाने साैरकृषीपंप ही याेजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली आहे.
मागील वर्षीपासून या याेजनेच्या अमंलबजावणीला वेग आला आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावले जात आहेत. गडचिरेाली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीपातळी वरच आहे. त्यामुळे साैरकृषीपंप चांगले काम करीत आहे. साैर कृषी पंपासाठी अर्जस्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागते.
पाच हेक्टरपर्यंत शेत असल्यास तीन एचपीचा पंप दिला जाते. तर पाच हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्यास पाच एचपीचा पंप दिला जाते. एससी व एसटीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के तर इतर लाभार्थ्यांना १० टक्के रक्कम भरावी लागते.
महत्वाच्या बातम्या : –
‘या’ १५ कृषी यंत्रांवर ५०% अनुदान मिळवा
महाराष्ट्रातील विविध भागात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटल
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान
शेतकऱ्यांना दिलासा, ‘या’ योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार
पावसामुळे सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान