काका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती
पनवेल तालुक्यातील वावंजे गावात सज्जन पवार आणि त्यांचा पुतण्या प्रशांत पवार यांनी स्ट्रॉबेरीची शेती करण्याचा निर्णय घेतला आहे आणि काका पुतनायचा हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. गेल्या वर्षी म्हणजेच नोव्हेंबर २०२० मध्ये महिन्यात त्यांनी स्ट्रॉबेरीची १ हजार रोपं लावली. यासाठी त्यांना तब्बल १५ हजार रुपये खर्च आला अशी माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांच्या स्ट्रॉबेरी ३०० रुपये किलो या दराने विकल्या जात असून आतापर्यंत त्यांनी तब्ब्ल ४५ हजार रुपये कमावले आहेत.
स्ट्रॉबेरी हे थंड हवेत येणारं पीक आहे. मात्र पनवेल ल एक अनोखा प्रयोग करत काका पुतण्याच्या जोडीनं हे पीक पनवेल तालुक्यात घेतलं आणि त्यांना त्यात त्यांना यश देखील मिळालं आहे.
काही महिन्यांपूर्वी या काका पुतण्यानं एका कृषी संमेलनाला हजेरी लावली होती. त्यात त्यांना महाडमधील एका शेतकऱ्यानं स्ट्रॉबेरीचा प्रयोग केल्याची माहिती मिळाली. त्यापासून प्रेरणा घेत त्यांनी आपल्याही शेतात स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचा निर्णय़ घेतला.
जर महाडमध्ये हा प्रयोग यशस्वी होऊ शकतो, तर पनवेलमध्ये का नाही, असा विचार या दोघांना आला आणि त्यानंतर या दोघांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली. पाहता पाहता हा प्रयोग यशस्वी झाला आणि काही महिन्यांतच त्यांना उत्पादन खर्चाच्या तिप्पट रक्कम स्ट्रॉबेरीच्या विक्रीतून मिळाली. अजूनही स्ट्रॉबेरीची विक्री सुरू असून त्यांचा फायदा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या : –
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याची तयारी सुरु
तब्बल १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले साैरकृषीपंप
‘या’ १५ कृषी यंत्रांवर ५०% अनुदान मिळवा
महाराष्ट्रातील विविध भागात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटल
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान