जनावरांची तहान भागवण्यावरही होतोय आक्षेप, काय आहे नेमक प्रकरण ? वाचा सविस्तर..
सोसायटीतले वाद आता आपल्यासाठी काही नवीन गोष्ट नाहीत. मात्र कोल्हापूर शहरातल्या एका सोसायटीमध्ये वेगळ्याच कारणावरून वाद निर्माण झालाय.आणि त्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे. चला तर नेमकं हे काय प्रकरण आहे हे जाणून घेऊ…
उन्हाळा आल्यामुळे प्राण्यांसाठी पाणी ठेवा अशाप्रकारची मोहिम प्राणीप्रेमी संस्थांकडून दरवर्षी राबविली जाते. मात्र असे असतानाच एका सोसायटीने प्राण्यांची तहान भागवणाऱ्या प्राणीप्रेमी आजरी कुटूंबाला पाण्याचा हौद काढून टाकण्याची नोटीस पाठविली आहे.
बसवराज आजरी कुटूंबिय जे मूळचे गडहिंग्लज येथील आहे मात्र गेल्या २५ वर्षे कोल्हापूरात राहत आहे. राजारामपुरी येथील गोविंदराव कोरगांवकर कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या प्लॉट क्रमांक ३२ वर घर बांधताना त्यांनी महानगरपालिकेच्या हद्दीतील आपल्या घराबाहेर प्राण्यांसाठी असे दोन पाण्याचे हौद बांधले होते, यातील पाणी ते रोज बदलतात. त्यामुळे येता जाता कित्येक प्राणी येथे येऊन पाणी पिऊन आपली तहान भागवतात.
प्राण्यांचा वावर वाढला तर मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होऊ शकते आणि कोरोनाचा धोका वाढू शकतो असे कारण देऊन सोसायटीने आजरी कुटूंबाला हे हौद सात दिवसांत हटविण्याची नोटीस दिली आहे आणि हे हौद न काढल्यास हा हौद स्वखर्चाने काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. या सोसायटीत ५२ प्लॉटधारक असून यातील निम्म्याहून अधिक प्लॉटधारकांनी हौद हटविण्यासाठी स्वाक्षऱ्या केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.
२६ सप्टेंबर २०१८ रोजीही सोसायटीने आजरी यांना पूर्वसूचना दिली आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन बाबा जगताप यांनी दिली आहे. दरम्यान, ही माहीती आजरी कुटूंबांनी सोशल मिडियावर व्हायरल केली असून त्यांना प्राणीमित्रांकडून जोरदार पाठिंबा मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या : –
उपवासाला का खातात वरईचा भात? काय आहेत फायदे?
रासायनिक खतांमधील भेसळ कशी ओळखावी ? वाचा सविस्तर
हळदीचे किती सेवन करावे आणि काय आहेत त्याचे फायदे एकदा नक्की वाचा
शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार व्यतिरिक्त आणखी 3 हजार रुपये मिळतील, लवकर करा नोंदणी
‘या’ शेतकऱ्याने गावरान पपईचे उत्पन्न घेत कमविला तब्बल ३ लाखांचा नफा