
1) माणूस जसा थंडी, उन, वाऱ्यापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी कपडे घालतो. तशीच गरज जमिनीला असते हे सिद्ध झाले आहे.
2) गांडुळे, मुंग्या, मुगळे इ. नजरेला दिसणारे सजीव आणि न दिसणारे विविध सूक्ष्मजीव, बुरशी इ. सजीव जमिनीत सतत काम करीत असतात.
3)या सजिवांच्या क्रिया व्यवस्थित चाल जमिनीत सेंद्रिय पदार्थ, ओलावा आणि योग्य तापमान आवश्यक असते. त्यासाठी जमीन झाकलेली असणे आवश्यक असते.
4) जमिन तापल्यास जमिनीतील लहान-मोठ्या सर्वच सजीवांच्या कार्य थांबते. म्हणून ओला, वाळलेला कचरा , पालापाचोळा आणि जमिनीवर पसरणारे मोट मुग,उडीद, रताळी वेल, व बोरू धैचा सारखे हिरवळीचे पीक इ. द्वारे आच्छादन करता येते.
5)आच्छादनामुळे तणांचे नियंत्रण साधते.
6)आच्छादनामुळे जिथल्या तिथेच खतनिर्मिती होते, ति क्रिया सतत सुरू राहते. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्याचा पुरवठा सातत्याने होत राहतो.
7)शेतात उगवलेले तनकट कापून जागेवरच सोडणे, गिरिपुष्प, करंज यासारख्या झाडाची पाने आच्छादनासाठी उपयोगी पडतात यामुळे जमिनीत ओलावा भरपूर टिकून राहतो, बाष्पीभवन होत नाहीत. त्यामुळे ओलिताची गरज खूप कमी होते.
लेखन-
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर.
B.Sc.Agri,M.Sc.Food Science & Tech.,P.G.D in Agri.Business.
संस्थापक अध्यक्ष,
तेजदिप शेतकरी,कृषी व कृषी पदविधर विकास संस्था,उंडाळे,ता.कराड, जि.सातारा.
मो.नं- 9021025147
महत्वाच्या बातम्या : –
पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणारे, सामान्य जनता नाखूष
डाळिंबावरील रोग आणि रोगाचे नियंत्रण कसे करायचे ते जाणून घ्या
जिवाणू स्लरी म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे जाणून घ्या
वांगी पिकातील मर रोग व शेंडे अळी