लाल मिरचीचे भाव घसरण्याची शक्यता, व्यापाऱ्यांची लगबग सुरू

0

कळमना बाजारात गेल्या सोमवारी लाल मिरचीची २५ हजार पोती उतरली होती. मिरचीची खेप आणखीन उतरणार असल्याने मिरचीचे भाव घसरण्याची शक्यता व्यापारी वर्तवत आहेत. त्यामुळेच व्यापाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.

भिवापुरी लाल मिरची बाजारात उतरायला लागली आहे. मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कळमना येथील मिरची बाजारात व्हायला लागले आहे. सद्यस्थितीत ही आवक सामान्य मानली जात असून, डोमेस्टिक, एक्सपोर्टर्स व स्टॉकिस्ट्सकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने लाल मिरचीचे दर ५-७ रुपयांनी वाढले आहेत.

मात्र, १५ मार्च नंतर लाल मिरचीची आवक वाढल्यावर हे दर कमी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. भिवापूर, लाल मिरची होलसेलमध्ये १२० ते १४० रुपये, राजुरा येथील देवनूर डिलक्स लाल मिरची १३० ते १६० रुपये, एण्डो-५ लाल मिरची १३० ते १५० रुपये, ३४१ ग्रेड लाल मिरची १३० ते १६० रुपये,खम्मम/गुंटूर ची तेजा मिरची १४० ते १५५ रुपये, ३३४ ग्रेडची लाल मिरची १२० ते १२५ रुपये किलो दराने सद्य:स्थितीत विकली जात आहे. हे दर येत्या काळात आवक वाढल्यावर घसरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ओरिजनल भिवापुरी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने, ही मिरची २०० रुपये किलो दराने विकली जात असल्याचे सांगितले जात आहे. भिवापुरी हायब्रिडचे दरही २०० रुपये किलो सुरू आहे. कमी उत्पादन क्षमता असल्याने शेतकरी ओरिजनल भिवापुरीऐवजी हायब्रिड लाल मिरचीचे पीक घेण्यावर भर देत आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

मिरची खत व्यवस्थापन

धान्य साठवणुकीत होणारे नुकसान टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना

फळधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी उपाययोजना

कोरोना काळातही शेती क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित

तीन वर्षांत अडीच पटीने वाढले मक्याचे क्षेत्र, ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड

 

Leave a comment