शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार; धानाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांची व्यथा

0

कोरोना या अजराने सर्वांना भयभीत केले असले, तरी मजुरांना घाबरू चालत नाही. आम्ही शेतात राबलो नाही, तर रात्री चूल कशी पेटणार, अशी व्यथा धानाच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी सांगितली आहे.

सध्या संपूर्ण राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. सध्या संचारबंदी असल्याने संपूर्ण नागरिक घरात थांबले आहेत. मात्र, हातावर पोट असलेले गाव खेड्यातील मजूर या कोरोना संकटातही शेतात दिवस रात्र राबताना दिसत आहे. सध्या शेतात उन्हाळी धान काढणीचा हंगाम सुरू आहे.

ताेंडाला मास्क लावून हे मजूर शेतात राबत आहेत. घरी असलेल्या लं मुलांची चिंताही त्यांना सतावत आहे. आरोग्याची काळजी घेत भीतीच्या सावटात मजूर राबत आहे. शेतीचा आधारच मजूर आहे. मजूर हा जर शेतात राबला नाही, तर शेतातील पिकलेलं धान्य शेतकऱ्याच्या घरी पोहोचणार नाही. सध्या धान काढणीला आला आहे. कोरोनाच्या सावटात शेतकरी मजुरांकडून काम करून घेत आहे. संकट कोणतेही असो, पण पोटासाठी सामना करावाच लागतो. शासनाने विविध योजना जाहीर केल्या आहे, परंतु या योजनांचा लाभही अनेक मजुरांना मिळत नाही. असे अनेक मजुरांचे म्हणणे आहे.

Leave a comment