बियाण्यांचे प्रमुख चार प्रकार आणि त्यांची माहिती

0

1. पैदासकार बियाणे – पैदासकार बियाणे सहसा बाजारात उपलब्‍ध होत नाहीत. हे बियाणे पायाभूत बियाणे तयार करण्‍यासाठी वापरतात. या बियाण्‍यांचा टॅगचा रंग हा पिवळा असतो.

2. पायाभूत बियाणे – हे बियाणे पैदासकार बियाण्‍यांपासून तयार करतात याचा टॅगचा रंग हा पांढरा असतो व हे बियाणे मुख्‍यत: प्रमाणित बियाणे तयार करण्‍यासाठी वापरतात.

3. प्रमाणित बियाणे – प्रमाणित बियाण्‍यांचा टॅगचा रंग हा निळा असतो. हे बियाणे धान्‍य उत्‍पादनाकरीता पेरणीसाठी उपयोगी पडतात.

4. सत्‍यप्रत बियाणे – या बियाण्‍यांचा टॅगचा रंग हा हिरवा असतो व हे बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात.

बियाणे वाण या बदल माहिती

संशोधित वाण –

खासगी बियाणे कंपन्या बाजारात विविध वाण विक्रीला आणत आहेत. दरवर्षी नवनवीन बियाणे ते बाजारात आणतात. आकर्षक जाहिराती, प्रचंड उत्पादन असल्याचे खोटे फोटो व शेतकर्‍यांच्या बनवलेल्या यशोगाथा इत्यादी मार्गांनी शेतकर्‍यांना प्रभावित केले जाते व एक-दोन हंगामांत पैसा वसूल होतो. परंतु हे वाण सातत्याने दरवर्षी उत्पादन देत नाही त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक होते. बहुतांश खासगी कंपन्या संशोधित वाण आणून अशी फसवणूक करत आहेत. ह्या वाणात सातत्याने दरवर्षी तेवढेच उत्पन्न देणारी आनुविंशकता नसते, म्हणून शेतकर्‍यांनी हे बियाणे घेण्याचा धोका पत्करू नये. हे बियाणे दरवर्षी त्याच कंपनीकडून विकत घ्यावे लागेल. त्यामुळे बियाणे कंपन्याच जगतील व सध्या हेच होत आहे.

संकरित बियाणे –

पिकांत दोन भिन्न वाणांच्या संकरापासून बियाणे मिळवितात. हे बियाणे पेरणीसाठी वापरल्यावर प्रथम पिढीत जोमदार संकरित (हायब्रीड) पीके मिळते. संकरापासून मिळालेल्या बियाण्यास संकरित म्हणजेच हायब्रीड बियाणे म्हणतात. हायब्रीड बियाण्यापासून मिळणाऱ्या पिकाच्या धान्यास हायब्रीड धान्य म्हणतात.

जिएम बियाणे – 

शास्ञातील विविध तंञचा वापर करूण पिकांच्या जनुक संचात बदल करूण अशी जनुके विशिष्ट पध्दतीद्वारे पेशी पटलमध्ये सोडली जातात आणि त्यापासुन सर्वोत्तम गुणधर्म दाखवणारे वाण तयार होते त्यास जिएम वाण जनुकीय सुधारीत वाण म्हणतात.

पारंपारिक वाण (बियाणे)-

स्वतः शेतात पिकवलेल्या पिकातील काही भाग बियाणासाठी राखून पुढील वर्षात पेरणीसाठी वापरणे म्हणजे शेतात पारंपारिक वाण वापरणे होय. असे वाण (बियाणे) कुठलीही रासायनिक प्रक्रिया न करता किंवा किरणोत्सर्गी प्रक्रिया न करता पुनरुत्पादन करण्यासाठी वापरले जाते.

स्थानिक बियाणे –

विशिष्ट भागातील शेतक-यांनी काही वर्षा पासुन घेतलेली शुध्द व निरोगी बियाणे. या बियाण्यास स्थानिक बियाणे म्हणतात.

निवड बियाणे –

आपल्याच शेतातील चांगले दर्जेदार उच्च माल जास्त दिसणारे व रोग व किडी कमी असणारे झाडे एकञ करूण बियाणे केले जाते त्यास निवड बियाणे म्हणतात (selection वान) वरिल बियाणाच्या प्रकारची माहिती शेतकरी मंडळीला असावी.

Leave a comment