कामातून ब्रेक घेत भिडे मास्तर आपल्या मूळ गावी घेतोय विश्रांती

0

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सगळीकडे लोकप्रिय आहे. नुकतेच या मालिकेने १२ वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या १२ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे. तसेच या पात्रांमुळे जे कलाकार या पात्रांना निभावतात त्यांना देखील खऱ्या आयुष्यात एक वेगळी ओळख मिळाली आहे.

गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे म्हणजे अभिनेता मंदार चांदवडकर. तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतून नावारुपाला आलेल्या मंदारने नुकताच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून सध्या मंदारचा हा व्हिडिओ तुफान चर्चेत आहे.

मंदार चांदवडकर हे तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून बऱ्याच दिवसातून वेळ काढत नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या मुळगावी गेले आहेत. गावात राहणाऱ्या भावाच्या शेतामध्ये त्याने हा व्हिडिओ शूट केला आहे. आपल्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढत तो सध्या फिरायला गेला आहे.

मंदार सध्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर या आपल्या मूळ गावी आहे. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनापासून लांब इथे शांत वाटत असल्याची भावनाही त्यानं व्यक्त केली आहे. गावच्या शेतातले व्हिडिओ, फोटोज शेअर करत “नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर या माझ्या गावी आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक इथे आहे असं हे पवित्र आणि सुंदर ठिकाण आहे”, असं कॅप्शनही दिलं आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मा या दिर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक हिंदी मालिकेत मंदार आत्माराम भिडे ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नुकतंच मंदारने आणि या मालिकेच्या इतर काही कलाकारांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या मराठी विनोदी कार्यक्रमात हजेरीही देखील लावली होती.

Leave a comment