लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांना रडविले

0

कांदा लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, यावर्षी लागवडीचा खर्च वाढल्याने उन्हाळी कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणले असून आता कांद्याला काय भाव मिळणार, याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे. देशातून कांदयाची निर्यात सुरू राहिली, तर कांद्याला अपेक्षित भाव निश्चित मिळू शकतो, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोदोरी, जसापूर, पिंपरी पूर्णा, काजळी, देऊरवाडा, माधान, थुगाव, निंभोरा या भागांत सर्वाधिक कांदा लागवड होते. विशेष म्हणजे, उच्च शिक्षण घेऊन नोकरीच्या तयारीत असणाऱ्या अनेक युवकांनी कांदा लागवड करून आपला कल शेतीकडे वळविला आहे.

दरवर्षी शेतकरी कांदा लागवडीसाठी ५०० ते ६०० रुपये पायलीने बीज खरेदी करतात. मात्र, यंदा कांद्या बियाणाच्या एका पायलीसाठी दोन हजार रुपये द्यावे लागले आहेत. त्यामुळे कांद्याच्या लागवड खर्चात मोठी वाढ झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांनी यंदा कांद्याला कमीत कमी १५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.कांद्याला यंदाचा लागवडीचा खर्च ५० हजारांच्या घरात आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा झाला आहे. खत, फवारणी, रासायनिक औषधींच्या वाढलेल्या दरामुळेदेखील शेतकरी हैराण आहेत.

महत्वाच्या बातम्या : –

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय,शेतकऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ लाखांचे बिनव्याजी पीककर्ज

कार्ली व दोडका लागवड मार्गदर्शन

कांदा पिक मार्गदर्शन

निमेटोड व मर रोगाचे नियंत्रण

शेतीत वापरले जाणारे औषध किती प्रमाणात विषारी आहे ते अश्या प्रकारे ओळखा

 

Leave a comment