शेतकऱ्यांचे आज देशभर रेल रोको आंदोलन

0

गेल्या अनेक महिन्यापासून दिल्लीच्या विविध सीमेवर कृषी कायद्याविरोधात क्षेत्री आंदोलन करत आहे.शेतकरी आंदोलनाचा आज ८४वा दिवस आहे. संयुक्त किसान मोर्चाने घोषित केल्याप्रमाणे आज म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुपारी १२ ते ४ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे.पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मोर्चातर्फे नियोजन करण्यात आले आहे.

आज म्हणजेच १८ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभर रेल रोकाचे आवाहन करण्यात आले आहे, तर २० फेब्रुवारीला यवतमाळ इथे महापंचायत होणार आहे अशी माहित देण्यात आली आहे. या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत आणि महासचिव युधवीर सिंह उपस्तिथ असणार आहे. यवतमाळच्या आझाद मैदानावर घेण्यात येणार आहे.

दरम्यान दुसरीकडे, शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाने मंगळवारी रात्री पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. हरप्रीत सिंह असे आरोपीचे नाव आहे. तो मूळचा पंजाबचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

हरप्रीतने त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. हल्ल्यातून दुबे थोडक्यात बचावले. मात्र त्यांच्या मानेवर तसेच बोटांवर किरकोळ इजा झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या कॉफी पिण्याचे अनेक फायदे….

धान, गहू, हरभरा, डाळी या पिकांची पेरणी एसआरआय पद्धतीने केल्यास कमी किंमतीत मिळेल जास्त उत्पन्न

‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना पंजाबमध्ये राबविण्यात ‘या’ महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता

हळदीला उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा भाव

शेतकऱ्याने खरेदी केले चक्क ३० कोटींचे हेलिकॉप्टर

Leave a comment