विदर्भातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी, शेतपिकांचं मोठं नुकसान

0

हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील काही विभागात अगोदरच पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर विदर्भातील अनेक भागात काळ्या ढगांची दाटी दिसून आली. विदर्भाच्या काही भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.

हवामाना विभागाच्या अंदाजानुसार 20 मार्चपर्यंत विदर्भ, मराठवाड्यात वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यताय वर्तवण्यात आली आहे. सध्या काश्मीर, लडाख या भागांत पश्चिमी विक्षोपाचे वारे वाहत असून त्यामुळे हिमवृष्टी होतेय. तसंच पूर्वांचल भागात वादळी पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी मणजेच आज विदर्भात बहुतांश ठिकाणी वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.  विदर्भाचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा आणि परिसरातील गावात अवकाळी पावसामुळे व गारपीटीने हजेरीं लावल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

पावसामुळे रब्बी हंगामातील गहू पीकही शेतकऱ्यांच्या हातातुन निघून गेले आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल पाच वाजताच्या दरम्यान चिखलदरा परिसरात जोरदार वारा व अवकाळी पाउस व गारपीट झाली. त्यामुळे चिखलदरा मध्ये अनेक ठिकाणी गारांचे ढीग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. मध्य भारतात २४ तारखेपर्यंत ढगाळ वातावरणाचा तसेच पावसाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या : –

कारंजामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा, उत्पादनातही मोठी घट होण्याची शक्यता

उत्तराखंडनंतर आता ‘या’ राज्यात गांजाची लागवड वैध होऊ शकते, वाचा सविस्तर

जर विक्रेता रेशन देण्यास नकार देत असेल तर या क्रमांकावर कॉल करा, त्वरित कारवाई केली जाईल

उन्हाळ्यात स्वस्थ राहण्यासाठी ‘या’ गोष्टींचे सेवन करा कोणतीही समस्या उद्भवणार नाही

डाळिंब खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहे काय ? जाणून घ्या

Leave a comment