पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याची तयारी सुरु

0

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता पाठवण्याची तयारी सुरु झाली आहे. ही योजना सुरु झाल्यापासून 11.61 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घातला आहे. मात्र, आतापर्यंत 2.89 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आतापर्यंत मिळालेला नाही अशी माहिती समोर आली आहे.

सन्मान योजनेच्या यादीत तुमचं नाव नसेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करु शकता. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाण्याची गरज नाही. तयासाठी पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर भेट द्या.

तिथे योजनेवर क्लिक करा. त्यानंतर फार्मर्स कॉर्नर्स या पर्यायवर क्लिक करा. तिथे न्यू फार्मर रेजिस्ट्रेशन वर क्लिक करा. यानंतर आधार कार्ड आणि कॅप्चा टाका. यानंतर तुमची माहिती मिळाली नाहीतर ‘RECORD NOT FOUND…DO YOU WANT TO REGISTER…असा मेसेज समोर आल्यास हो पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर नवीन अर्ज ओपन होईल. तिथे सर्व माहिती योग्य प्रकारे भरा. बँक खाते क्रमांकासह IFSC कोड व्यवस्थित भरा. यानंतर जमीनीची माहिती भरा. यानंतर नोंदणी क्रमांक मिळेल. तो क्रमांक आपल्याकडे जपून ठेवावा. कृषी विभागाकडून तुमचा अर्ज व्हेरिफाय केला जाईल आणि नंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील.

नरेंद्र मोदी यांनी 25 डिसेंबर 2020 ला सातवा हप्ता जारी केला होता. तेव्हापासून आतापर्यंत 60 लाख 50 हजार 280 शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. मार्च महिन्यापर्यंत आणखी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार जमा केले जाणार आहेत. पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 21 फेब्रुवारीपर्यंत 11.64 कोटींवर पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या : –

तब्बल १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले साैरकृषीपंप

‘या’ १५ कृषी यंत्रांवर ५०% अनुदान मिळवा

महाराष्ट्रातील विविध भागात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटल

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक भागातील शेतीचे नुकसान

शेतकऱ्यांना दिलासा, ‘या’ योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार

Leave a comment