केळी लागवड व खोडवा

0

केळी हे सर्वांचे आवडते फळ. केळीची लागवड तशी किनार पट्टीय भागात होते. तेथील….. वातावरण अनुकुल, परंतु याची लागवड सर्वदुर होऊ लागली. विशेषता – “जळगाव ची केळी” म्हणुन नाव लौकिक मिळवला. कारण… पण तसे आहे –तापीकाठच्या पिवळया गाळाच्या मातीत केळी भरपुर उत्पादन देते.

केळीला मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी भरपुर हिरवळीचा बायोमास काडीकचरा असलेली सुपिक जमीन असावी. केळी लागवडी आधी हिरवळीचे पिक म्हणून मुग उडीद चवळी मठ धैंचा हरबरा असे द्विदल पिक परीपक्व करुन उत्पादन घेऊन बायोमास जमीनीत टाकावा. सुरुवातीला भरपुर शेणखत टाकावे किंवा गुर शेळ्या मेंढ्या बसवाव्यात. एकरी ५००-१००० किलो घनजिवामृत लागवडी आधी टाकुन घ्यावे.

केळीचे वाण :-

१)बसराई ही ठेंगणी जात आहे.१५ ते ३० किलो पर्यंतचा घड येतो.४.५ x ४.५ फुटावर लागवड करतात.

२) श्रीमंती–हि उंच वाढणारी जात असून १५-३५किलो पर्यंत चे घड येतात,५.५ x ५.५फुटा
वर लागवड करतात.

३)ग्रँड नैन :- ही जात उंच वाढणारी असुन २० -४५ किलो पर्यंत घड येतात हिचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम आकाराची केळी व जास्त फण्या येतात, त्यामुळे विक्रीच्या व उत्पादननाच्या दृष्टिने हिला मागणी जास्त आहे व त्यामुळे हिचेक्षेत्र वाढले आहे.

५.५x ५.५ फुटावर किंवा
६ x ४.५ फुटावर लागवड करतात.
६ x ४.५ फुटावर लागवड करतांना दोन रोपात ६ फुट व दोन ओळीत .४.५ फुट अंतर ठेवुन झिक झाक त्रिकोणात लागवड करावी.म्हणजे दोन झाडात ६ फुटच अंतर येवुन ओळी वाढुन झाडांची संख्या वाढते .
तसेच…. लालकेळी, चक्र केळी, अशा अनेक जाती आहेत.

हंगाम :-

मृगबाग – जुन /जुलैत लागवड

कांदेबाग — आक्टोबर.ते नोव्हेंबर लागवड.

रामबाग– डिसेंबर ते जानेवारी लागवड.

केळी कंद निवड:-

केळी लागवडीसाठी कंद मुनवे रोगमुक्त नैसर्गिक बागेतुन निवडा. कंद३ ते ४ महिने वयाचे ५०० ते ७५० ग्रॅम वजनाचे असावेत. सर्वसाधारण ४ ते ७ चक्री असलेला कंद निवडावा.
बिजामृतात कंद बुडवुन लागवड करावी.प्रत्येक पाण्यासोबत जिवामृत द्यावे व दर १५ दिवसांच्या अंतराने एक फवारणी जिवामृत तर दुसरी आंबट ताकाची करावी.

सहजीवन:-

केळीत दोन रोपाच्या मधे तुर (कमी वाढणारी) ,खुरटीचवळी मठ उडीद घेवडा मेथी गवार हंगामा नुंसार टोकावा तसेच…… काही अंतरावर मका टोकावा, तसेच कोथंबीर पालक शोप ह्या पालेभाज्या लावाव्यात

कांदे बाग ही कांदालागवड करुन त्यात केळी लावावी. एकरी २००-४००लिटर जिवामृत जमीनीवर व फवारणी साठी पिक लहान असतांना.

१) २०० लिटर पाणी १०लिटर जिवामृत.

२)२००लिटर पाणी १५लिटर जिवामृत

३)२००लिटर पाणी २०लिटर जिवामृत हेच प्रमाण चालु ठेवावे.

फळपोषण काळात सप्तधान्य अर्कची घडावर फवारणी करावी.केळीला उष्ण वाऱ्या पासुन संरक्षण मिळावे म्हणुन चारही बाजुने बांधावर फुले संपुर्णा हे बहुवार्षिक चारा पिक लावावे, तसेच चारही बाजुने तुरीच्या दोन ओळी सरळघनदाट पेराव्यात.

तुर उंच वाढणारी असावी. किंवा शेवरी ची एक ओळ किंवा एरंडी ची एक ओळ किंवा ऊसाच्या दोन ओळी लावाव्यात मधे १०x१०वर मका टोकावा. रामबागेत दर दहा ओळी नंतर मका एक ओळ पेरावी.,

खोडवा

केळीचा खोडवा घेतांना केळी निसल्यावर एक पिल प्रत्येक ओळीत कुठल्याही एका बाजुला वाढु द्यावा व बाकीचे पिल कापत राहवे. कापणीनंतर तो खांब कापु नये, फक्त…. शेंडा कापुन पानाचे आच्छादन करावे खांब जसाचातसा ऊभा राहु द्या. खांब वरुन हळुहळु सुकत जावुन त्यातील अन्नद्रव्यपिलबाग साठी ठेवलेल्या झाडास मिळते. ……..पहिल्या पिकास जसे व्यवस्थापन केले तसेच पिलबागेस करावे.झाड निसल्यावर पिल सोडल्याने चारमहीने चा कालावधी आधीच पिलसोडल्याने पुढील पिक चारमहीने आधी आपल्या हातात येते असे अनेक खोडवे घेवु शकतात .

केळी खोडवा पिकाचे फायदे

▪️खोडवा पद्धतीचा अवलंब केल्यास पूर्वमशागत, रोपे, नवीन लागवडीचा खर्च करावा लागत नाही.

▪️मातृपिकाची सारी शोषण यंत्रणा त्याच जागी खोडवा पिकास मिळते. परिणामी, पिकाची वाढ लवकर होते. पीक लवकर तयार होते.

▪️खोडवा पिकाचे उत्पादन पहिल्या पिकापेक्षा निश्‍चितपणे अधिक असते.

महत्वाच्या बातम्या : –

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीतुन मिळू शकतो आराम , शेणपासून बनवलेले नेचुरल गैस CNGचा होणार उपयोग

यवतमाळच्या बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाज्यचे दर स्थिर

शेतकऱ्याने उजाड माळरानावर फुलवली द्राक्षांची बाग

नरखेड परिसरात शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण; उजनीचे पाणी भोगावती नदीत आले

Leave a comment