खरबुज लागवड बद्दल आधुनिक माहिती

0

खरबुज हे सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले वेलवर्गीय फळपीक असून वर्षभर जरी मागणी असली तरी उन्हाळ्यामध्ये मागणी मोठ्या प्रमाणात असते. कमी खर्चात, कमी पाण्यावर व ७० ते ९० दिवसांमध्येच येणारे मधुर, गोड, स्वादिष्ट अशा या वेलवर्गीय फळपिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे.

हे पीक पुर्वी नदीकाठच्या भागामध्ये, पावसानंतर नदीकाठचे पाणी ओसरल्यानंतर जानेवारीमध्ये लागवड करून घेतले जात असत. अशी नदीकाठची जमीन भाडेपट्ट्याने घेतली जाते. परंतु यामध्ये एप्रिल – मेच्या ढगाळ हवेमुळे, अकाली पावसामुळे नुकसान होत असे. आता हे पीक नदीकाठच्या भागातच न घेता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बागायती पीक म्हणून शेतकरी यशस्वीरित्या घेऊ लागले आहेत.

जमीन 

सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये खरबुजाची लागवड करतायेते. चुनखडीयुक्त, खारवट, चोपण जमीन लागवडीस अयोग्य आहे. कारण अशा जमिनीत अति प्रमाणात असणाऱ्या कॅल्शियम सल्फेट क्लोराईड, कार्बोनेट व बायकार्बोनेटसारख्या विद्राव्य क्षारांमुळे कलिंगड, खरबूज फळांवर डाग पडण्याची शक्यता असते. तेव्हा लागवडीसाठी हलकी, पोयट्याची, मध्यम काळ्या ते करड्या रंगाची, पाण्याचा निचरा होणारी जमिन लागवडीस योग्य आहे.

हवामान 

उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. वाढीच्या कालावधीत हवेमध्ये दमटपणा व धुके असल्यास वेलींची वाढ
व्यवस्थित होत नाही व पीक रोगास बळी पडण्याची शक्यता असते.

जाती 

नंदुरबार, शहादा भागामध्ये हिरव्या रंगाच्या स्थानिक जातीत आतून मगज (गर) असतो. या जातीच्या खरबुजाचा स्वाद अतिशय गोड, पाठ कडक व टिकाऊपणा जादा असल्याने अशा जातींची लागवड इस्राईलमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली इस्राईल भेटीमध्ये दिसून आली. तेव्हा अशा जातींच्या निर्यातीस वाव आहे. गुजरातमधील कच्छच्या रानामध्येही ही जात लावली जाते. तेव्हा स्थानिक जातींची सर त्यांच्या वैशिष्ठ्यांमुळे इतर नवीन जातींना
येणार नाही. या संदर्भात यु. एन. ओ. मार्फत ब्युरो ऑफ जेनेटिक्स अॅण्ड सीड बँकमध्ये ज्या नामवंत जाती एफ. ए. ओ. ने जपल्या आहेत. त्याच तोडीच्या जाती तिकडे पाठविल्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी राहील . ह्या स्थानिक जातींचे उत्पन्न व दर्जा इतर संकरीत जातींपेक्षाही चांगला रिझल्ट विदर्भ, खानदेश, अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कळविलेले आहे, हे लक्षात घेण्यासारखे आहे.इतर केशरी रंगाचा गर असणाऱ्या जाती लवकर मऊ पडतात व स्वाद सपक असतो.

संकरीत जाती 

१) कुंदन – ही जात – नोन- यु सीड्स (इंडिया) प्रा. लि. ची असून फळे लंबगोल आकाराची, वजनाने १.५ किलो ते २ किलो पर्यंत असतात. एका वेळीस २ ते ३ फळे सारख्या आकाराची व वजनाची येतात. फळाचा रंग आकर्षक, पिवळसर व त्यावर सफेद बारीक जाळी असते. जाळीदार खरबुजामध्ये देठ मजबूत असलेले वाण आहे. फळाची टिकवण क्षमता काढणीनंतर १० ते १२ दिवसापर्यंत राहते. बियांची लागण केल्यापासून ८० ते ८५ दिवसात फळ काढणीयोग्य होते. गराचा रंग आकर्षक केशरी, फळामधील पोकळी खुपच कमी असल्याने गराचे प्रमाण जास्त
असते. चवीला हा वाण अतिशय गोड व सुंगधी आहे. एकरी उत्पादन १२ ते १५ तन मिळते.

२) बॉबी : कुंदनप्रमाणेच बॉबी जातही नोन – यू सीडसची असून तिची फळे कुंदनच्या तुलनेने आकाराने लहान असल्याने उत्पादन थोडे कमी असले तरी बाजारपेठेत फळांना मागणी असल्याने भाव चांगले मिळतात. त्यामुळे चांगले पैसे होत असल्याने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे.

३) एन.एस.९१०: हा वाण नामधारी कंपनीचा असून फळे ६० ते ६५ दिवसात तयार होतात. फळाचे वजन १.५ ते २ किलो असून फळांचा आकार गोल असतो. सोनेरी पिवळी व जाळीदार साल असून पोकळी मध्यम व गर घट असतो. टी. एस. एस. १३ ते १४% असून अधिक उत्पादन क्षमता, खुप गोड, साठवणुकीस व वाहतुकीस चांगला वाण आहे.

याशिवाय दीप्ती, सोना, केशर या जातींचाही दर्जा व उत्पादन चांगले असल्याने लागवडीस शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या आहेत.

लागवडीचा योग्य काळ

साधारण ७० ते ९० दिवसात हे पीक तयार होते. याची विशिष्ट गोड चव व रंगामळे या फळास चांगली मागणी असते. एरव्ही मोठ्या आकाराचे ५ किलोचे कलिंगड २० ते ३० रू. च्या आसपास जाते. पण खरबूज साधारण अर्धा ते एक किलोचे २० ते ३० रुपयास मिळते.त्यामुळे कमी वजन व कमी आकार शिवाय एका वेलीवर ४ फळे सहज धरता येतात. महणून ह्या फळाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत आहे. ऑक्टोबर, दसऱ्यानंतर व्यापारी पद्धतीने याची लागवड करून थेट नोव्हेंबर अखेर व परत थंडी कमी झाल्यावर संक्रांतीनंतर भोई लोक वाळत
व शेतकरी जानेवारी ते फेब्रुवारी अखेर ह्याची लागवड बागायती शेतीती करतात. म्हणजे फळे साधारण मार्च -एप्रिलमध्ये मिळाली तर पैसे खूप मिळतात. तसेच आंब्याच्या अगोदर मार्केटला आणली म्हणजे पैसे हमखास मिळतात. नंतर आलेल्या फळास भाव कमी मिळतो. अकाली पावसात सापडून नुकसान होते. तरी परिस्थितीनुरूप लागवड करावी.

लागवड

लागवड आळे पद्धतीने किंवा सरी पद्धतीने करतात. शक्यतो सरी पद्धतीनेच लागवड कारवी. दोन मीटर अंतरावर
सऱ्या काढून सरीच्या दोन्ही बाजूस लहान – लहान आळी करतात. एका आळ्यामध्ये एकाच बी लावावे. पाणी कमी असल्यावर १०’ x ४’ अंतरावर सरी काढून लागवड करावी. सरी काढून बी टोकल्यास वेल पसरायलाही जागा राहते.

बियाणे

सुधारित जातीचे साधारण अर्धा किलो बी पुरेसे होते, तर संकरीत जातीचे बी एकरी १०० ते १५० ग्रॅम लागते. थंडीमध्ये बियांची उगवण कमी होये व वाढ लवकर होत नाही. याकरित कोमट पाण्यामध्ये सीडकॅप हे औषध 10 लि. पाणी या प्रमाणात) या द्रावणात बी ४ -५ तास भिजवून नंतर सावलीत सुकवून लावल्यास बियांची उगवण २
ते ३ दिवस लवकर, एकसारखी व निरोगी होते. मर होत नाही. बियांची ६ ते ८ दिवसांनी उगवण होते

पाणी कसे द्यावे ? 

माल लवकर पोसावा म्हणून त्याचबरोबर वारंवार वीज जाणे, या गोष्टींमुळे शेतकऱ्यांकडून पाणी
प्रमाणापेक्षा जास्त दिले जाते. त्यामुळे रोग पडण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा पाणी टेक पद्धतीने द्यावे. म्हणजे वरंब्यावर, आळ्यावर, हुंडीवर मातीचा अर्धा भाग भिजेल या पद्धतीने पाणी द्यावे. भिज पाणी पद्धतीमुळे खोडला पाणी जादा झाल्यास मुळकुजव्या (कॉलररॉट) होण्याची शक्यता असते. पानांच्या खालच्या बाजूस ओलावा राहिल्यास थंडी, ऊन यामुळे पाण्याची वाफ होऊन खालच्या भागातली पाने करपतात. शेंडा वाळतो, तेव्हा टेक पाणी देणे जास्त योग्य आहे.

खत

लागवड केल्यानंतर ड्रीम टच सेंद्रिय खत वापरावे वरील पद्धतीने दिल्यास वाढ चांगली होते. रासायनिक खतास
हल्लीच्या जाती लवकर प्रतिसाद न देता रोगास बळी पडतात. फळांच्या गाठी मोठ्या झाल्यावर तर अजिबात रासायनिक खते वापरू नयेत.

कीड

खरबुजावर मावा, तुडतुडे, भुंगेरे, फळमाशी इ. किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. या किडींच्या बंदोबस्तासाठी Fighter, missile, success सुरवातीपासूनच वापर करावा.

रोग

१) करपा : वेलवर्गीय पीक असल्यामुळे पानांवर लव अधिक असून वेळ जमिनीवर पसरल्याने दमट हवामानामध्ये रोगाचे प्रमाण वाढते. पानांवर तपकिरी ठिपके दिसतात. रोग मोठ्या प्रमाणात झाल्यास सर्व पाने गळून पडतात.

२) भुरी : पाने दोन्ही बाजूंनी भुरकट होऊन गळतात. थंडी जास्त असल्यास सर्व जातींना भुरी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

३) मर : बुरशीजन्य रोग असून वेली संपुर्ण गळून जातात.

उत्पादन

साधारणपाने ८० ते ९० दिवसांमध्ये फळे काढणीस येतात. खरबुज पिकल्यानंतर (तयार झाल्यावर ) मधुर वास येतो व फळाचा देठ सुकतो. खरबुजाचे साधारणत: १० ते १५ टन एकरी उत्पादन मिळते.

महत्वाच्या बातम्या : –

जाणून घ्या उन्हाळी बाजरी लागवड बद्दल संपूर्ण माहिती

सागवृक्ष लागवड व संवर्धन माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान देणार – अजित पवार

काका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती

Leave a comment