गुलाब लागवड पद्धत

0

भारताप्रमाणे जागतिक बाजारपेठेत गुलाबाचा प्रथम क्रमांक लागतो. दरवर्षी गुलाबाचे उत्पादन वाढतच आहे. विकसनशील देशात गुलाबाची लागवड मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्व आफ्रिकेच्या अनुकूल हवामानामुळे तेथे अत्युच्च प्रतीच्या गुलाबाची निर्मिती होते. भारतात या पिकाखाली ३००० एकर क्षेत्र आहे. युरोपात या फुलास प्रचंड मागणी आहे. जवळ जवळ 80 टक्के फुले युरोपात विकली जातात. त्या खालोखाल १५ टक्के फुलास तर अवघी ५ टक्के फुले आशिया व ऑस्ट्रेलियात विकली जातात. सध्या जपानमध्ये फुलांना मागणी वाढत आहे.

जागतिक बाजारपेठेत हायब्रीड टी (लांब दांडा व मोठी फुले) प्रकाशबरोबरच फ्लोरीबंडा (आखुड दांडा व लहान फुले) प्रकारच्या फुलांना मोठी मागणी आहे. हरितगृहात लांब दांड्याच्या (५०-१२० सें. मी. ) मोठ्या फुलांचे १३५-१५० फुले चौ. मी. एवढे उत्पन्न मिळते तर आखूड दांड्याच्या (३०-७०) सें. मी. छोट्या फुलांचे २००-३५० फुले/ चौ. मी. एवढे उत्पन्न मिळते.

हवामान:-

गुलाबाच्या लागवडीकरिता कमीत कमी १५ अंश से. तर जास्तीत जास्त २८ डिग्री से. तापमानाची आवश्यकता असते. रात्रीचे तापमान १५-१८ डिग्री से. च्या दरम्यान असावे. तापमान वाढत गेल्यास अधिक उत्पादन मिळते पण फुलांची प्रतवारी बिघडते. पाकळ्यांची संख्या कमी होते. फुले लवकर उमलतात व फुलांचे काढणीत्तोर आयुष्य कमी होते.

वाढत्या तापमानानुसार पाकळ्यांची संख्या कशी कमी होते हे खालील तक्त्यावरून दिसून येते.

सरासरी तापमान (अंश से.)पाकळ्यांची
११.११७
१६.७१९
२२.१११
२७.२
३३.3

गुलाबामध्ये सूर्य प्रकाशापेक्षा तापमान जास्त ठरते. काही जातींना जास्त तापमान लागते तर काहींना कमी, काही जाती कमी तापमानात ब्लाईंड शूटस (फुले न येण्याचा प्रकार) अजिबात निर्माण करत नाही. कमी तापमानाबरोबर कमी आर्द्रता व पाण्याचा ताण सहन करू शकतात.

ठिकाण व जागेची निवड:-

हरितगृहातील गुलाबाच्या लागवडीसाठी जागेची निवड करणे फारच महत्वाचे ठरते. बॅंगलोर सारखे वर्षभर सम हवामान असणारे ठिकाण निवडल्यास हरितगृहातील तापमान नियंत्रण करण्याचा खर्च वाचू शकतो. जागेची निवड करताना आजूबाजूस मोठया इमारती व झाडे नसावीत. जेणेकरून, हरित गृहावर सावली पडणार नाही.

बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय विमानतळ आपल्या लागवडीच्या ठिकाणापासून दूर असतो. अशा वेळेस दूरवर वाहतूक करावी लागते. वाहतुकीच्या काळात काढणीत्तोर तंत्राचा सुयोग्य वापर केल्यास इच्छित स्थळी फुले अगदी व्यवस्थित पाठविता येतात.

जमीन:-

गुलाबाची मुले जमिनीत खोलवर जात असल्याने जमीन भुसभुशीत व कमीत कमी ५० सें. मी. खोल असावी. निवडलेल्या जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा व्हावा. मध्यम प्रतीच्या जमिनीत गुलाब चांगला येतो कारण अशा जमिनीतून अन्नद्रव्यांचा योग्य प्रकारे पुरवठा होतो. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात अन्नद्रव्ये घातल्यास गुलाब चांगल्या प्रकारे वाढवता येतो तसेच अशा जमिनीत सामू यापेक्षा जास्त असल्यामुळे डोलोमाईट वापरून तो योग्य त्या प्रमाणावर आणता येतो. १.७५ कि. ग्रॅ. डोलोमाईट प्रति घन मीटर वापरल्यास जमिनीची सामू ०.३-०.५ युनिटने वाढू शकतो. जमिनीचा सामू ७.० वरून ५.० आणण्यासाठी सल्फर १.५ कि. ग्रॅ. किंवा अॅल्युमिनिअम सल्फेट ३.९ कि. ग्रॅ. चा वापर करावा. जमिनीत क्लोरीन व सोडियमचे प्रमाण १.५ मि./लि पेक्षा कमी असावे.

जमिनीची मशागत:-

जमिनीच्या वरच्या (३० से.मी.) व खालच्या (३१-६० से.मी.) थरांचे रासायनिक पृथक्करण करून घ्यावे म्हणजे जमिनीतील क्षारांचे प्रमाण व अन्न द्रव्यांची उपलब्धता लक्षात येईल. त्यानंतर जमिनीचा सामू जर जास्त असेल तर तो योग्य प्रमाणावर आणावा. हलक्या जमिनीत शेणखत, पीट मिसळून त्या जमिनीचा कस वाढवावा, असे करण्याने, अशा जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. तर भारी जमिनीतून पाण्याचा निचरा होतो. कोंबडी खत हॉर्न मिलचा वापर टाळावा. लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतूकीकरण करून घ्यावे. त्यासाठी फॉर्मलीन ०.२ टक्के प्रमाणात वापरावे.

वाफे तयार करणे व लागवडीची पध्दत:-

जमिनीच्या प्रकारानुसार वाफ्यांचा प्रकार बदलतो. जर जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत असेल तर सपाट वाफे तयार करून त्यावर दोन रोपात २५ से.मी. तर दोन ओळीत ८० से.मी. अंतर ठेवून लागवड करावी. जर जमिनीतून पाण्याचा योग्य निचरा होत नसेल तर गादी वाफे तयार करावेत. दोन गादी वाफ्यांमध्ये ४० से.मी. खोल व ८ से.मी. रुंद वर काढावा म्हणजे पाण्याचा योग्य निचरा होईल.

सर्वसाधारणपणे ६-७ झाडे प्रति चौ. मी. लावावीत. वाफ्याची रुंदी १ मीटर दर दोन वाफ्यात ६० से.मी. अंतर ठेवावे. वाफ्याची लांबी २५ ते ४० मीटर पर्यंत ठेवावे.

लागवडीसाठी रोपे:-

कॅह्न्गल्या प्रतीची रोपे लागवडीसाठी वापरावीत. गुलाबाची कलमे तयार करण्यसाठी रोझा इंडिका ओडांराटा, रोझा मल्टीफ लोरा, एडवर्ड रोसेझ, थॉर्नलेस बॅंगलोर जातीचे खुंट वापरतात. त्यापैकी रोझा इंडिका ओडांराटा ही जात खुंट म्हणून चांगली आहे. गुलाब लागवडीसाठी पॉलिबॅग पध्दत वापरून रोपे तयार करतात. सदर रोपांवर पाहिजे त्या जातींचे डोळे भरून अथवा कलम करून ती रोपे तयार करतात. सदर रोपांवर पाहिजे त्या जातीचे डोळे भरून अथवा कलम करून ती रोपे लागवडीसाठी वापरतात.

लागवडीची पद्धत:-

गुलाबाची रोपे महागडी असल्यामुळे व ती एकाच जागी ५-६ वर्षे राहणार असल्यामुळे सुरुवातीस लागवड करताना काळजी घ्यावी. लागवडीपूर्वी २४ तास अगोदर रोपांना पाणी दयावे. जमिनीत रोपांसाठी खडडा घ्यावा व त्यात रोपे लावावित. रोपांची मुले दुमडु नयेत. डोळे भरलेला भाग जमिनीवर २-३ से.मी. राहील याची काळजी घ्यावी. जास्त खोलवर लावलेल्या रोपांना मूळ कुजव्या रोग होतो व रोपांची वाढ व्यवस्थित होत नाही. रोपांना दररोज व्यवस्थित पाणी दयावे. प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकांच्या एक दोन फवारण्या कराव्यात. झाडांना वळण देणे वाढणाऱ्या झाडाला जर लगेच फुले येऊ दिली तर झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. झाडाचा आकार नीट राहत नाही. झाडांच्या वाढीच्या काळात वाटाण्याच्या आकाराच्या कळ्या झाल्यावर त्या काढून टाकाव्यात, झाडांची वाढ व्यवथित झाल्यावर मग मोठ्या फांद्या जमिनीपासून २०-३० सें. मी. अंतरावर छाटाव्यात मग त्यावर फुले घेण्यास सुरुवात करावी. फांद्या छाटण्याएवजी यू आकारात जमिनीलगत वाकविल्या तरी चालतात. त्यामुळे झाडाला जास्तीचा अन्नपुरवठा मिळतो व फुलेही जास्त मिळतात.

खते:-

जवळजवळ भारतातील सर्वच जमिनीत अन्नद्रव्यांची कमतरता आहे. अधिक उत्पादन मिळविण्यासाठी खतांची आवश्यकता भासते. लागवडीपूर्वी व लागवडीनंतर माती परीक्षण खताच्या मात्रा द्याव्यात. लागवडीच्या वेळेस २ किलो सुपर फॉस्फेट १ किलो कॅल्शियम अमोनियम नायट्रेट आणि ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति चौ. मी. द्यावे. तसेच शेणखत, पीत व भूसाही जमिनीत मिसळून द्यावा. एकाच वेळेस खते देण्याएवजी वेगवेगळ्या हफ्त्यात ती विभागून द्यावीत. हरितगृहात द्रवरूप खते पाण्यात मिसळून दिली जातात. प्रत्येकी २०० पीपीएम नत्र व पालाश पाण्यातून रोपांना दिले जाते. त्यासाठी ८५ ग्रॅम पोटँशिअम नायट्रेट व ८० ग्रॅम अमोनियम नायट्रेट प्रथम प्रति लिटर पाण्यात घेऊन ते नंतर २०० लिटर पाण्यात मिसळून झाडांना दिले जाते.

पाणी देणे:-

हरितगृहातील गुलाबाला ठिबक संचातून पाणी दिले जाते. त्यामुळे रोपांना हवे तेवढेच पाणी देता येते. लागणारे पाणी हे तापमान, आर्द्रता व सूर्यप्रकाश यावर अवलंबून असते. हे खालील तक्त्यावरून दिसून येईल.

हवामानबाष्पिभवन (मि. मि.)लागणारे पाणी प्रति चौ. मी. (लिटर)
ढगाळ हवामान
३० टक्के सूर्यप्रकाश
७० टक्के सूर्यप्रकाश
१०० टक्के सूर्यप्रकाश
उष्ण हवामान

 

उष्ण व कोरडया हवामानाच्या काळात हवेत आर्द्रता वाढवून तापमान कमी करता येते. त्यासाठी मिस्टर्स व फोगर्स वापर करून हवेत पाणी उडविले जाते व त्यामुळे तापमान कमी होते.

फुलांची काळजी:-

फुलांची काढणी शक्यतो सकाळच्या वेळी थंड वातावरणात करावी म्हणजे फुले जास्त काळ फिल्ड हिट कमी करण्यासाठी शीतगृहात ठेवावी लागत नाहीत तो खर्च वाचतो. फुलांची काढणी धारदार कात्रीने करावी. झाडावर १ ते २ पूर्ण वाढ झालेली (पाच पाने असणारी) पाने ठेवावीत म्हणजे नंतर येणारी फुलेही चांगल्या व लांब दांड्याची राहतील, जर पूर्ण वाढ झालेली पाने झाडावर ठेवली नाही तर मात्र फुलदांड्याची लांबी कमी राहते.

फुलाची काढणीत्तोर काळजी:-

फुले काढल्यानंतर पांढरा मिनिटांत ग्रेडिंग हॉलमध्ये न्यावीत. प्रीझरवेटीव्ह म्हणून पाण्यात अॅल्युमिनियम सल्फेट टाकावे. या द्रावणात 3 तास फुले ठेवावीत व पॅकिंग हॉलचे तापमान १० सें च्या आसपास ठेवावे. नंतर प्रतवारी करावी व प्रतवारी नंतर फुले पुन्हा याच द्रावणात किंवा क्लोरीनच्या पाण्यात ठेवावीत. बादलीत ७-१० सेमी. पर्यंत द्रावण असावे. या द्रावणात फुले पॅकिंग करेपर्यंत ठेवावीत. जर वरील प्रीझरवेटीव्ह उपलब्ध नसतील तर २०० लिटर पाण्यात ३ किलो साखर व ६ ग्रॅम सायट्रिक अँसिड मिसळून द्रावण तयार करावे व त्यामध्ये फुले ठेवावीत.

प्रतवारी:-

गुलाबाच्या फुलांची प्रतवारी फुलदांड्याच्या लांबीवरून फुलाची लांबी वगळून केली जाते. प्रत्येक ग्रेडमध्ये १० से.मी. अंतर ठेवावे फुलांची ग्रेड ३० ते ९० सें. मी. ग्रेडमध्ये केली जाते. फुलदांड्याच्या लाम्बिबरोबरच दांड्याची जाडी, फुलाचा आकार, पाने व रोग व किटकनाशकांच्या रेसेडयुचाही विचार प्रतवारी करतांना केला जातो. प्रतवारी केलेल्या एका ग्रेडधील सर्व फुले त्याच प्रतीची असावीत. अन्यथा एखादे खराब फुल सारीच प्रतवारी बिघडवून टाकते. ग्रेडिंग केल्यावर पुन्हा फुले प्रीझरवेटीव्ह द्रावणात ठेवावीत.

पॅकिंग:-

२० ते २५ फुलाची एक जुडी याप्रमाणे जुड्या बांध्याव्यात. त्यानंतर प्रत्येक जुडी पेपरमध्ये गुंडाळावी असे पेपरमध्ये गुंडाळलेले बंच कोरुगेटेड बॉक्समध्ये भरावेत. बॉक्सला आतून पॉलिथिनचे लायनिंग असावे. जेणेकरून बॉक्स्मधील गरम हवा लगेचच बाहेर काढता येईल. शीतगृहातील तापमान २ से. ग्रे. पर्यंत असावे. बॉक्सचे तापमान शीतगृहाच्या तापमान इतके होण्यास १०-१२ तास लागतात. शीतगृहात ९० टक्क्यांच्या आसपास आर्द्रता ठेवावी म्हणजे डी-हायड्रेशन होणार नाही.

शीतसाखळी :-

फुले पॅक केल्यापासून ते ग्राहकाला मिळेपर्यंत शीत गृहाइतकेच राहण्याकरिता खालीलप्रमाणे शीतसाखळी असावी.

१. शेतावर शीतगृह असावे.

२. वाहतुकीसाठी रेफर व्हॅन असावी.

३. विमानतळावर शीतगृह असावे.

४. विमानात लगोलग माल भरणे.

५. विमानात शीतगृह सुविधा असावी.

६. माल उतरल्यावर तो शीतगृहात ठेवावा.

७. रेफर व्हॅनमधून ग्राहकाकडे पोहोचवावा.

उत्पादनाचे नियोजन:-

बरयाचदा बाजारात एकाच वेळेस माल आल्यामुळे फुलांच्या किमती उतरतात व उत्पादकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते. ते टाळण्यासाठी जर फुले काढणी पुढे ढकलता आली तर उत्पादकांचा फायदा होतो. त्यासाठी फांदीवरील शेंड्याकडील भाग खुडून टाकावा म्हणजे फुलांची काढणी उशिरा सुरु होते.

झाडांना विश्रांती देणे:-

युरोपला आपल्या देशात निर्यात मुख्यतः ऑक्टोबर ते एप्रिल या काळात होते. कारण या काळात थंडीमुळे तेथे फुलांचे उत्पादन होत नाही व नियंत्रित तापमानाला फुले वाढविणे फार खर्चिक होते. इतर वेळी फुलांची निर्यात करणे आपणास फायदेशीर ठरत नाही. कारण आपली फुले त्यांच्या मालाशी स्पर्धा करू शकत नाहीत. म्हणूनच एक तर आपणास दुसरी बाजारपेठ शोधावी लागते किंवा मग अंतर्गत बाजारपेठेत कमी किमतीत विकावी लागतात. व ते परवडणारे नसते. त्यामुळे या ऑफ सिझनच्या काळात झाडांना विश्रांती दिल्यास पुढील काळात चांगली फुले मिळू शकतात. झाडांना विश्रांती देण्यासाठी शेवटचे फुल काढल्यानंतर ४-८ आठवडे पाणी देऊ नये. त्या काळात बरीचशी पाने पिवळी पडून झडून जातात. त्यानंतर मग ३०-६० से. मी. वर झाडांची छाटणी करावी. छाटणीनंतर खते व पाणी द्यावे. त्यानंतर येणाऱ्या फुटीचे कडक उन्हापासून शेडनेट वापरून संरक्षण करावे.
जुन्या झाडांचे नुतनीकरण

सर्व साधारणपणे जुनी झाडे काढून नवीन लावली जातात. पण बरयाचदा काही कारणास्तव असे करता येत नाही. त्यासाठी मग जुन्या झाडांचे नुतनीकरण खालीलप्रमाणे करावे. झाडांना विश्रांती देण्यासाठी ३-५ आठवडे पाणी देणे थांबवावे. झाडांच्या सभोवती जमिनीवर आच्छादन करावे आणि गाडी वाफ्याची उंची वाढवावी. नवीन फुट काढून टाकावी व अस्तित्वात असलेली जुनी फुटही काढून टाकावी. पाणी देणे थांबविल्यावर ३-५ आठवड्यांनी ३०-६० से.मी. उंचीवर झाडांची छाटणी करावी. त्यानंतर नियमित पाणी व खते दयावीत. नवीन फुटीचे शेंडे खुडावेत अथवा वाकवावेत. नंतर येणाऱ्या नवीन फुटीवर फुले घ्यावीत.

वेगवेगळ्या जातींची भारतातील उत्पादकता

जातीचे नावरंगउत्पादन फुलझाडे प्रती चौ. मी.
फर्स्ट रेडलाल१३०-१४०
इस्काडालाल१८०-१९०
रोव्हेलगडदगुलाबी१२०-१३०
नोबेलसीगुलाबी१४०-१५०
स्कायलाईनफिकट पिवळा११०-१२०
टेक्सासपिवळा१५०-१६०
पेटोपिवळा१६०-१७०
टिनकेपांढरा१४०-१५०
निकोलद्विरंगी८०-९०
विवाल्डीगुलाबी१४०-१६०

 

जातीचे नावरंगउत्पादन फुलझाडे प्रती चौ. मी.
फ्लोरीबंडा
गोल्डन टाईम्सपिवळा१६०-१९०
लंबाडाऑरेंज२४०-२५०
किसगुलाबी२५०-२६०
फिस्कोपिवळा२००-२५०
व्हॅनीलाक्रिम२५०-२८०
एस्किमोपांढरा३००-३२०

 

स्रोत – कृषी विभाग महाराष्ट्र शासन 

महत्वाच्या बातम्या : –

आवळा लागवड पद्धत

कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावा पाहिजे टाळा – रामदास आठवले

पुणे ठरले सर्वात थंड शहर, पुढील दोन – तीन दिवस तापमानातील घट कायम राहणार

शेतकरी आंदोलनावर सायना नेहवाल आणि अक्षय कुमारचे ‘कॉपी-पेस्ट’ ट्विट

गुड़मार म्हणजे काय? त्याची लागवड कशी करावी जाणून घ्या

Leave a comment