अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

अवकाळी पावसाचा भंडारा जिल्ह्यातील अनेक भागांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . बुधवारी म्हणजेच १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या सर्व भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे वातावरणात आता गारवा निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

मंगळवारी म्हणजेच १६ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. तर रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले त्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झालेल्या या पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. गहू, हरभरा, उडीद, मूग, लाखोरी आदी पिकांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतेत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरात तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारच्या तुलनेत दोन अंश घट नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला असून या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख  यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : –

शेतकऱ्यांचे आज देशभर रेल रोको आंदोलन

जाणून घ्या कॉफी पिण्याचे अनेक फायदे….

धान, गहू, हरभरा, डाळी या पिकांची पेरणी एसआरआय पद्धतीने केल्यास कमी किंमतीत मिळेल जास्त उत्पन्न

‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना पंजाबमध्ये राबविण्यात ‘या’ महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता

हळदीला उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा भाव

 

Leave a comment