आंबा मोहोर संरक्षण फवारणी
हवामानामध्ये होणारा अचानक बदल यामुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण व कोंडत हवामान राहिल्यास आंबा पिकावरील तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढ होत असते. मोहोरावरील तुडतुडे मोहोरातील कोवळया फळातील रस शोषून घेतात.
त्यामुळे मोहोर गळून पडतात. याशिवाय तुडतुडे मधासारखा चिकट पदार्थ शरीरावाटे बाहेर टाकतात याला स्थानिक भाषेत चिकटया किंवा गोडया असे देखील म्हणतात. तर पानांवर त्यावर काळी बुरशी वाढते, त्यामुळे झाडे, फळे काळी पडतात. तुडतुडे व भुरी यांच्या नियंत्रणासाठी सुधारित वेळापत्रकाप्रमाणे औषधे फवारावीत.
फवारणी कालावधी, किटकनाशक औषधे व 10 लि.पाण्यातील प्रमाण याबाबतची माहिती पुढील प्रमाणे. पहिली फवारणी-पालवीवर मोहोर येण्यापूर्वी,डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही किंवा मोनोक्रोटोफॅस 36 टक्के प्रवाही,9 मि.ली. 15 मि.ली. या फवारणीमुळे पावसाळयानंतर कोवळया फुटीवर येणाऱ्या तुडतुडयांपासून संरक्षण होते.
दुसरी फवारणी (बोंगे फुटताना)-लॅम्बडा सायलोथ्रीन 5 टक्के, 6 मि.ली.,या फवारणीमध्ये भूरी रोगांच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मि.ली.किंवा पाण्यात विरघळणारे गंधक 80 टक्के 20 ग्रॅम तसेच ढगाळ व पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम 12 टक्के + मॅन्कोझोब 63 टक्के 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
तिसरी फवारणी (दुसऱ्या फवारणी नंतर मोहोर फुलण्यापूर्वी दोन आठवडयांनी)- इमिडाक्लोप्रिड 17.80 टक्के 3 मि.ली. चौथी फवारणी (तिसऱ्या फवारणी नंतर दोन आठवडयांनी)-थायोमेथाक्झाम 25 टक्के (WDG) 1.0 ग्रॅम, 10 मि.ली. पाचवी फवारणी (चौथ्या फवारणी नंतर दोन आठवडयांनी)- डायमेथोएट 30 टक्के प्रवाही किंवा लॅम्डासायलोथ्रीन 5 टक्के, 10 मि.ली,6 मि.ली. तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीच्या वेळेस किटकनाशकाच्या द्रावणामध्ये भूरी रोगाच्या नियंत्रणासाठी 5 टक्के हेक्झाकोनॅझोल 5 मि.ली. किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (80 टक्के) 20 ग्रॅम तसेच ढगाळ व पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम 12 टक्के + मॅन्कोझोब 63 टक्के 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वापरावे.
सहावी फवारणी (पाचव्या फवारणी नंतर गरज असल्यास दोन आठवडयांनी)- पाचव्या फवारणीमध्ये सुचविलेल्या किटकनाशका पैकी न वापरलेल्या किटकनाशकाची फवारणी करावी. गरज असल्यास फवारणी करावी.
विनोद धोंगडे, नैनपुर
महत्वाच्या बातम्या : –
भातावरील किडी आणि प्रभावी नियंत्रण
१०० रूपाने पेट्रोल घेऊ शकता तर मग दूध का नाही ? शेतकऱ्यांचा प्रश्न
पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे काय आणि त्याचा काय परिमाण होतो जाणून घ्या…
डाळिंब प्रक्रिया उद्योग करून शेतकरी कमाऊ शकतात दुप्पट नफा
कांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन