तीन वर्षांत अडीच पटीने वाढले मक्याचे क्षेत्र, ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड
कमी खर्चात चांगले उत्पादन देणारे पीक म्हणून मका पिकाकडे बघितले जाते. त्यामुळे दरवर्षी मका पिकाखालील क्षेत्र वाढत चालेले असल्याचे दिसून येते. मागील तीन वर्षांत सुमारे अडीच पटीने मक्याचे क्षेत्र वाढले आहे.रबी हंगामात नाेव्हेंबर-डिसेंबर महिन्यात मका पिकाची लागवड केली जाते. १२० दिवसांत हे पीक हाती येते. जवळपास मार्च-एप्रिलमध्ये मका पीक निघते.
कृषी विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार यावर्षीच्या रबी हंगामात ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड झाली आहे. धान पीक निघाल्यानंतर शेतकरी प्रामुख्याने उडीद, मूग, लाखाेळी, चना या पिकांची लागवड करीत हाेते. मात्र आता याच शेतीत शेतकरी आता मका पिकाची लागवड करीत आहे.
शासनाने शेतकऱ्यांना अनुदानावर सिंचन विहिरी उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच नैसर्गिक पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांना माेटारपंप देण्यात आले आहेत. २०१८ मध्ये १,५२४ हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली. त्यानंतर २०१९ मध्ये २,५७१ व २०२०-२१ मध्ये ४,५३४ हेक्टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे.
मागील वर्षी १,७६० रुपये क्विंटल दराने मक्याची खरेदी करण्यात आली. खरेदी केंद्रांमुळे मका विक्रीची समस्या दूर झाली आहे. त्यामुळे लागवडीखालील क्षेत्र वाढत चालले असल्याचे दिसून येत आहे. मका पिकाचे उगमनस्थान मुलचेरा तालुका आहे. मुलचेरा तालुक्यातील बंगाली समाजाच्या शेतकऱ्यांनी सर्वप्रथम मका पिकाची लागवड केली. त्यांची अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करण्यास सुरुवात केल्यानंतर जिल्हाभरात मका पिकाचे क्षेत्र वाढले.
महत्वाच्या बातम्या : –
नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात
रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे
तेजपानचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, एकदा वाचाच