मातीचे आरोग्य सांभाळा, माती जिवंत ठेवा माती धूळ नाही, जिवंत परिसंस्था
माणसाला शेतीचा शोध लागला म्हणजे, त्याने मारुण खाण्याऐवजी पेरुण खायला सुरुवात केली. आणि एका नवीन संस्कृतीचं बिज रोवल्या गेल्.एका दाण्यात हजार दाणे निर्माण करण्याची उद्भुत क्षमता हे ह्या मातीचे सर्वात मोठे वैशिष्ट आहे. हि क्षमता निर्माण करणारा घटक म्हणजे माती. या सुपिक मातीवरच आपल्या शेतीचा आणि अवघ्या जिवसृष्टीचा डोलारा उभा आहे.जिचा आपण काळी आई म्हणुन गौरव करतो तीच आज मरणासुन्न अवस्थेत पडलीय. थोडक्यात आपल्या जमिनीला ग्रहण लागलय.
जमिनीचे आरोग्य बिघडल्याने जमिन झपाटयाने नापिक होतेय. आपण वेळीच जागे झालो नाही तर, शेती , पर्यावरण आणि समाज यांच्यावर होणाऱ्या दुष्परिणामांनं आपल्याला सामोर जावे लागेल. शास्त्रज्ञ म्हणताय, भविष्यात मुलांना नुसता सातबारा उतारा नका देवू, त्यासोबत उत्कृष्ट पध्दतीची जमिनपण दया.
योग्य दिशेने प्रयत्न केले तर आपण आपली जमिन वाचवू शकतो. योग्य खत व्यवस्थापन आणि फायदेशीर शेती उत्पादन यासाठी मातीपरिक्षण हे एक शेतीच अवश्य अंग आहे .माती परिक्षणामुळे आपल्या जमिनीचा सामु किती आहे, त्यात कुठले अन्नघटक किती प्रमाणात कमी जास्त आहेत हि माहिती मिळते. ह्यामुळे शेतकरी बांधवांच्या खर्चात बचत होवून. संतुलीत खतांचा वापरून भरघोस उत्पादन काढता येते.. माती परिक्षणाचे अमुल्य फायदे शेतकरी बांधवांना कळत आहेत.
आपले आजोबा वडील हे पारंपरिक पद्धतीने शेती करत आलेत. तेही रासायनिक खतांचा वापर करतच होते. परंतु त्या वेळच्या जमिनी ह्या सुपीक जमिनी होत्या शेणखताचा योग्य वापर व्हायचा व त्याचबरोबर जमिनीची पोत टिकवून होती. आताचा विचार केला तर परिस्थितीत बदल झालेला आहे.
कारण आपली जमीन नापीक होऊ लागले शेतकरी बांधवांनी वेळीच लक्ष दिलं तर त्याचा भला मोठा फायदा होऊ शकतो आज माती परीक्षणाचे अमूल्य फायदे शेतकऱ्यांना लक्षात येत आहेत ते आपल्या शेतीचे माती परीक्षण करुन घेत आहेत.
मी पंकज घटे शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, मी कुठला शास्त्रज्ञ नसून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील बीएससी ऍग्री झालेला व्यक्ती आहे. माझ्या परीने असलेल्या अनुभवातून मी आपल्यापर्यंत माती परीक्षणाचा संदेश पोचवीत आहे.
माती परीक्षणाचे फायदे
1) माती परीक्षणामुळे जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण समजते
2) जमीन आम्लधर्मी आहे की विम्लधर्मीय आहे त्यानुसार पिकांचे नियोजन करता येते.
3) संतुलित खतांचा वापर करता येतो पीक उत्पादन वाढीबरोबर खतांची बचत होते पिकांच्या वाढीस आवश्यक असणारे अन्नद्रव्यांचा समतोल कायम समतोल राखता येतो.
4) माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन वाढविण्यास मदत होते.
5) शास्त्रशुद्ध पद्धतीने मृदा नमुने काढण्यावर माती परीक्षण प्रयोगशाळेची गुणवत्ता व खतांची शिफारस मात्रा अवलंबून असते त्याकरिता योग्य माती नमुने प्रयोगशाळेत जमा करावेत.
माती परीक्षणाचे महत्व
मातीचा प्रातिनिधिक नमुना तयार करणे ही माती परिक्षणाची सर्वात महत्त्वाची कृती होय या नमुन्याचे रासायनिक पृथक्करण बऱ्याच अंशी अचूक सुपिक्ता दाखविते. माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील नमुन्याचे प्रमुख्याने रासायनिक पृथक्करण करून त्यातील उपलब्ध मुख्य नत्र स्फुरद पालाश कॅल्शिअम मॅग्नेशिअम सल्फर व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे लोह जस्त मंगल तांबे बोरॉन मॉलिब्डेनम इत्यादी प्रमाण तपासणी होय. आवश्यक असल्यास जमिनीची भौतिक व जैविक गुणधर्मांची तपासणी सुद्धा केली जाते.
मातीचा नमुना केव्हा घ्यावा
1) मातीचा नमुना वर्षातून केव्हाही आवश्यक असेल तेव्हा घेता येतो परंतु रब्बी पिकांच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यात घेतल्यास पुत्तकरण करून परीक्षण अहवाल पेरणी पर्यंत उपलब्ध होतो.
2) पिकांच्या काढणीनंतर च्या काहीवेळेस जमिनी कोरडे असताना.
3) जमिनीवर पीक उभे असताना मातीचा नमुना घ्यावयाचा असेल तर खाते दिल्यानंतर दोन महिन्यांनी मातीचा नमुना पिकांच्या दोन ओळींमधून घ्यावा.
4) कोणत्याही परिस्थितीत पिकांना दिलेल्या खतांच्या मात्रेनंतर लगेच च मातीचा नमुना घेऊ नये.
नमुना घेण्यासाठी उपकरणे व साहित्य
1) स्क्रू अगर
2) पोस्ट होल अगर
3) कुदळी खुरपी लाकडी खुंटी
4) प्लास्टिक कागद
5) प्लास्टिक बादली
6) कापडी पिशवी
7) मीटर पट्टी
8) पेन्सिल
9)माहितीपत्रक
10) लेबल
मातीचा नमुना घेण्याची पद्धती
प्रथम शेतात फेरफटका मारा निरीक्षण करा जमिनीच्या मगदुराप्रमाणे वनस्पती पिकांचा रंग वाढ भिन्नभिन्न असते तसेच जमिनीच्या पृष्ठभागावर चा रंग देखील वेगवेगळा असतो उतारावरील जमीन भुरकट रंगाची असते सखल भागातील काळी असते म्हणूनच उतार रंग पोत खोली व्यवस्थापन व पीक पद्धतीनुसार विभागणी करावी, प्रत्येक विभागातून स्वतंत्ररीत्या नमुना घ्यावा.
1) एक सारख्या जमीनीतून नमुना घेताना काडीकचरा गवत पिकांची धसकटे व मुळे काढून टाका
2) जिथे पिकांचे ओडीत पेरणी केली असेल अशा ठिकाणी दोन ओडी मधून नमुना घ्या.
3) नुकतेच खते टाकलेल्या जमिनी खोलगट भाग पाणथळ जागा झाडाखालील जमीन बांधा जवळील जागा खतांच्या ढिगाऱ्याजवळील जागा शेतातील बांधकामा जवळचा परिसर कंपोस्ट खतांचा जवळपासची जागा अशा ठिकाणातून मातीचा नमुना घेऊ नका.
4) सपाट पृष्ठभाग असलेल्या जमिनीवर 30 ×30×30 सेंटीमीटर. आकाराचा चौकोनी खड्डा करून आतील माती बाहेर काढून टाका खड्ड्याच्या सर्व बाजूंची दोन सेंटिमीटर जाडीची माती खुरपयाच्या साह्याने वर पासून खाल पर्यंत खरडून हातावर काढा आणि प्लास्टिकच्या बदली टाका. अशा रीतीने एका प्रभागातून दहा नमुने घेऊन त्याच बादलीत टाका.
5) ही सर्व माती एका स्वच्छ प्लास्टिकच्या कागदावर टाका चांगली मिसळा ओली असल्यास सावलीत वाळवा नंतर या डीगाचे चे चार समान भाग करा समोरील दोन भाग काढून टाका. उरलेले दोन भाग एकत्र मिसळा व पुन्हा चार भाग करा ही प्रक्रिया एक किलो माती शिल्लक राहीपर्यंत करा.
6) उरलेली अंदाजे एक किलो माती स्वच्छ कापडी पिशवीत भरा पिशवीत माहिती पत्रक टाका व एक लेबल पिशवीला बांधा.
7) शक्य तितक्या लवकर नमुने प्रयोगशाळेत पाठवा सर्वसाधारणपणे नमुना गोळा करणे व प्रयोगशाळेत पाठवण्यात दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ नसावा अन्यथा माती पृथकरण बदलण्याची शक्यता आहे
8) फळबागेसाठी मातीचा नमुना वेगवेगळ्या थरांमधून घ्यावा उदा. खड्डा खोदून पहिल्या एक फुटातील 30 सेंटीमीटर पर्यंत मुरूम नसल्यास 30 ते 60 सेंटिमीटर थरातील दुसरा तर व खोल जमिनीत 60 ते 90 सेंटिमीटर पर्यंत खोलीतील तिसऱ्या थरातील मातीचे नमुने स्वतंत्र घ्यावे व प्रयोग शाळेत पाठवावे.
9) जमीन शारयुक्त व शारयुक्त चोपण असल्यास पृष्ठभागावरील दोन सेंटीमीटर मधील शहर बाजूला करून नंतरच नमुना घ्यावा.
10) सुषम अन्नद्रव्य तपासणी करावयाची असल्यास लाकडी खुंटी अवजाराने मातीचा नमुना घ्यावा. कोणत्याही परिस्थितीत लोखंडी अवजारे उपकरणे माती नमुने घेण्यासाठी वापरू नका.
नमुना स्वच्छ कापडी पिशवीत भरावा सुषम अन्नद्रव्य यांसाठी मायक्रोनुटन माती नमुना घेताना जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचे आहे पिशवीवर सुषम अन्नद्रव्य तपासणीसाठी नमुना अशी नोंद करावी.
मातीचा नमुना कोठे व कसा पाठवावा
शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे ज्या प्रयोगशाळेत मातीचे योग्य परीक्षण केल्या जाते अशा खात्रीशीर लॅब मधलं मातीचे परीक्षण करा.
उदा. माणसाला ब्लड चेक करायचे असेल तर आपण कुठल्याही लॅबला रक्ताचा नमुना देत नाही जिथे योग्य रिपोर्ट मिळेल तिथेच देतो त्याच पद्धतीने मातीचे पण परिक्षण झाले पाहिजे. मातीचा नमुना घेतल्यानंतर खालील माहिती लिहून ती मातीच्या नमुना असलेल्या पिशवीत टाकावी मातीचा नमुना लवकरात लवकर जवळच्या माती परीक्षण प्रयोगशाळेकडे पाठवावा.
1)शेतकऱ्याचे नाव
2)पूर्ण पत्ता
3)गट नंबर
4)बागायत /कोरडवाहू
5)ओलिताचे साधन
6) जमिनीचा निचरा
7)जमिनीचा प्रकार
8) जमिनीचा उतार
9)जमिनीची खोली
10)नमुना घेतल्याची तारीख
11) मागील हंगामात घेतलेले पीक व त्याचे उत्पादन वापरलेली खते व त्याचे प्रमाण
12) पुढील हंगामात घ्यावयाची पिके त्यांची जात व अपेक्षित उत्पादन.
माती परीक्षणाचा रिपोर्ट आल्यानंतर
माती परीक्षणाचा रिपोर्ट मिळाल्यानंतर शेतकरी बांधवांनी कृषीच्या तज्ञ मंडळी कडन चर्चा करून योग्य ते खत व्यवस्थापन करावे.
महत्वाच्या बातम्या : –
द्राक्षातील खरड छाटणी नंतर सुप्त घड निर्मिती व सुप्त घड पोषणाची पंचसूत्री
विशेष मोहीम राबवून 15 एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना केसीसी कर्ज दिले जाईल
शेतात औषध फवारणीचे नियम काय ? एकदा नक्की वाचा तुम्हला देखील होणार यांचा फायदा
नियमित आंबा मोहरासाठी पॅक्लोब्युट्रॉझॉल
नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड