गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात ऊन वाढल्याने त्याचा थेट परिणाम नवीन गरवी कांद्यावर झाला आहे. नवी मुंबई, लासलगाव, पुण्यातील मार्केटयार्डसह राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात कांद्याची आवक सुरू झाली आहे. असे असले तरी कांद्याची आवक वाढल्याने येत्या काही दिवसात कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात उन्चा तडाखा कांद्याला बसल्याने कांदा पक्व झाला. मार्च महिन्यात अपेक्षापेक्षा जास्त उष्मा वाढल्याने त्याचा परिणाम कांद्यावर झाला आहे. परिणामी घाऊक बाजारात कांदा दरात घट झाली आहे. गुजरातमधील पांढऱ्या कांद्याची आवक सध्या बाजारात होत आहे. या कांद्याला घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा ते पंधरा रुपये असे दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात गुजरातमधील पांढऱ्या कांद्याला ३० ते ४० रुपये असे दर मिळत आहेत.
वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उन्हाळी कांद्याची मोठी आवक होत आहे. सोमवारी बाजार आवारात १४३ गाडय़ांमधून एकूण मिळूण १३ हजार ३२९ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लासलगाव बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढत असून दररोज तीन हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे. यापुढील काळात कांद्याची आवक वाढत जाणार असल्याने दरात घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या : –
करडांना जपा शेळीपालन करून आता शेतकरी कमवू शकतात दुप्पट नफा
अग्निशिखा /कळलावी या नावाने ओळखली जाणारी ही लिली प्रजातीतील एक वनस्पती
शेतकऱ्यांसाठी धावून आले अजितदादा, केल्या मोठ्या घोषणा
गोदामे हाऊसफुल्ल झाल्याने बंद, हजारो क्विंटल धान उघड्यावर
महिंद्राच्या जाहिरातीची जोरदार चर्चा, एकदा व्हिडीओ नक्की पाहा