
गायी व म्हशींमध्ये लम्पी आजाराची लक्षणे कशी ओळखता येणार ते जाणून घ्या
अहमदनगरमध्ये साधारण पंचवीस जिल्ह्यांत जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्याची माहित समोर आला आहे. गाय वर्गातील जनावरांना या आजाराचा जास्त प्रादुर्भाव होतो. काही ठिकाणी म्हशींमध्येही हा प्रादुर्भाव दिसून आला. अहमदनगरमधील तेरा तालुक्यांत साधारण पावणेपाचशे जनावरांना हा आजार झाला आहे. यातील बहुतांश जनावरे दुभती होती.
या आजारामुळे जनावरांच्या दुधात साधारण वीस टक्के घट झाल्याचे दिसून येत आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात काळजी न घेतलेली गाभण जनावरे आणि त्यांच्या प्रजनन क्षमेतवर परिणाम झाल्याचे दिसून आले. सध्या या आजाराचा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण पूर्णतः आटोक्यात आले असले, तरी बाधित जनावरांमध्ये विविध समस्या दिसून येत आहेत.
पशुसंवर्धन विभागाने तातडीने उपाययोजना करत बाधित जनावरांसह संपर्कात आलेल्या ९६ हजार जनावरांना लंम्पी स्कीन आजार प्रतिबंधक लसीकरण केले. मात्र, लसीकरण आणि प्रभावी उपाययोजना केल्याने ही साथ पूर्णतः आटोक्यात आली. सध्या नगर जिल्ह्यात एकही जनावर बाधित नाही.
या आजाराची लक्षणे खालील प्रमाणे –
जनावरांमध्ये पंधरा दिवस आजाराचा प्रभाव.
जनावरांना सुरुवातीला ताप येतो, अंगावर गाठी येतात.
नाकपुडी कोरडी पडते, चारा कमी खाते.
जनावरांना अशक्तपणा येतो.
वेदना होतात.
वेळेत उपचार झाले नाहीत, तर गाभण जनावरांचा गर्भपात होतो.
अंगावर आलेल्या गाठी फुटल्या तर त्याचा प्रभाव महिनाभर राहतो.
महत्वाच्या बातम्या : –
बकरी संगोपन करण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाख 40 हजार रुपयांचे अनुदान
पालाश म्हणजेच पोटॅशचे शेतीसाठी होणारे महत्व
निंबोळी अर्काचा किडीवर होणारा परिणाम
पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय ? त्याची वापरण्याची पद्धत व फायदे