मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश आंबेडकर

0

गेली जवळपास दोन महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारशी अनेकदा चर्चेच्या फेरीनंतर देखील शेतकरी कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. आता या आंदोलनाला महाराष्ट्रातून वंचित बहुजन आघाडीने देखील पाठिंबा दिला आहे.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शाहीन बागच्या धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारातुन दिनांक 27 जानेवारी रोजी सर्व जिल्ह्यात ‘किसान बाग’ आंदोलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अत्याचारग्रस्तांनी एकत्र येऊच नये असे आरएसएसचे षडयंत्र आहे ,म्हणुन मुस्लिम व इतर घटकांमध्ये संघर्ष निर्माण करण्याचे काम ते करतात. हे अत्याचार पिडित घटकांना विभागून त्यांच्यावर अत्याचार करू इच्छित आहे म्हणून किसान बागच्या  माध्यमातुन या आंदोलनात मुस्लिम समाजाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल, असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील निशाणा साधला.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नुकतेच 17 डिसेंबर रोजी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे आंदोलन सुरू ठेवून मुस्लिम समाज संघटनांना सोबत घेऊन आंदोलनकारी शेतकर्‍यांना समर्थन दर्शविण्यासाठी शाहीन बागच्या शैलीत एकदिवसीय ‘किसान बाग’ आंदोलन करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या : –

जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय, विषमुक्त, शेती करण्याचे फायदे व रासायनिक का नको….? ह्याबद्दलची 50 कारणे

जाणून घ्या कढीपत्त्याचे अनेक गुणकारी फायदे

दुधाचे फायदे आणि इतर पदार्थांपासून उत्पादित होणाऱ्या दुधाबाबत शास्त्रीय अभ्यास करावा – केंद्र सरकार

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीची ५ क्‍विंटल आवक

गुणकारी आणि औषधी हरभरा

Leave a comment