नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोळ कांद्याची आवक स्थिर

0

नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोळ कांद्याची आवक स्थिर राहिली. आवक ६९८३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १५०० ते ३५००, तर सरासरी दर २४०० रुपये राहिला.

बटाट्याची आवक ११५५२ क्विंटल, दर ७५० ते १३००, सरासरी १००० रुपये, लसणाची आवक २१२ क्विंटल, दर २६१० ते ८५००, तर सरासरी ६००० रुपये, आल्याची आवक ४९४ क्विंटल, दर १००० ते २५००, सरासरी १८०० रुपये राहिला.

हिरव्या मिरचीची आवक १०६१ क्विंटल, तर दर स्थिर होते. लवंगी मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते ३५००, सरासरी दर २७०० रुपये, गाजराची आवक १७९७ क्विंटल, दर ६०० ते १५००, सरासरी १००० रुपये राहिला.वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये भोपळा ५० ते १४०, तर सरासरी १००, कारले २१० ते ४२०, सरासरी ३१०, भेंडी १५० ते २७०, सरासरी २१० व दोडका ३०० ते ५४० तर सरासरी दर ४३० रुपये असे प्रति १२ किलोस दर मिळाले. काकडीला ३०० ते ५३०, सरासरी ४१० रुपये २० किलोस दर मिळाले.

वालपापडी-घेवड्याची आवक ४७८१ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ८०० ते २३००, सरासरी दर १५०० रुपये, घेवड्याला ५०० ते २५००, तर सरासरी दर १७०० रुपये राहिला. टोमॅटोला ५० ते १२०, सरासरी ८०, वांगी १५० ते ३१०, सरासरी २२० व फ्लॉवर ७० ते १७५ सरासरी ३१० रुपये असे दर प्रति १४ किलोस मिळाले.

महत्वाच्या बातम्या : –

बंद केलेली मका खरेदी सुरू, ३१ जानेवारीपर्यंत सुरु राहणार खरेदी

असे बनवावे घरच्या घरीच प्रभावी किड व बुरशी नाशक…

शेतकऱ्यांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य कंगनाला भोवले, सहा ब्रॅण्ड्सकडून करार रद्द

थंडीमध्ये पिकांची घ्यावयाची काळजी

दिल्लीतील हिंसाचारानंतर मायावतींनी केंद्र सरकारला केले ‘हे’ आवाहन

 

Leave a comment