१०० रूपाने पेट्रोल घेऊ शकता तर मग दूध का नाही ? शेतकऱ्यांचा प्रश्न

0

डिझेलचे भाव वाढवून केंद्र सरकारने शेतकऱ्यांची अडवणूक केली तर मग आता आम्ही येत्या १ मार्चपासून ५० रुपये लिटरचे दूध १०० रुपयांनी विकू, असा सज्जड इशारा संयुक्त किसान मोर्चाने केंद्र सरकारला दिला आहे.

दिल्लीच्या सीमेवरील गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. सरकारने प्रत्येकवेळी शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे. डिझेलचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना शेतात ट्रॅक्टर चालविणे आता अवघड होऊन बसले. १०० रुपयांवर पेट्रोलचचे भाव गेले तरी जनता केवळ शांत बसून पाहत बसली आहे.

जर नागरिकांना १०० रुपये पेट्रोलचे ओझे होत नाही तर मग याच दराने आम्ही १ मार्चपासून दूध विकणार आहोत, असा संकल्प संयुक्त किसान मोर्चाने केल्याची माहिती सिंघू सीमेवर आंदोलन करीत असलेले भारतीय किसान युनियनचे  जिल्हा प्रमुख मलकीत सिंह यांनी दिली.

शेतकरी कायद्याच्या विरोधात देशातील प्रत्येक राज्यात एक भव्य रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे. यात आंदोलनातील प्रमुख शेतकरी नेते मार्गदर्शनासाठी जाणार आहेत. गुरु रविदास जयंती आणि चंद्रशेखर आझाद यांच्या शहीद दिनानिमित्त आज म्हणजेच २७ फेब्रुवारी २०२१ रोजी दिल्लीच्या सीमांवर मजूर-किसान एकता दिवस साजरा केला जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या : –

पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे काय आणि त्याचा काय परिमाण होतो जाणून घ्या…

डाळिंब प्रक्रिया उद्योग करून शेतकरी कमाऊ शकतात दुप्पट नफा

कांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन

राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना व्याजाशिवाय मिळणार कर्ज आणि 50 हजार सौरपंप

CZC-94 नवीन जातीचे जिरे 90 ते 100 दिवसात होईल तयार, लागवडीचा खर्च होईल कमी

Leave a comment