१ )जीवनक्रम –
प्रथम आपण खोडकिडीचा जिवण क्रम समजुन घेऊ .पतंग दिवसा पाणाच्या मागे . खोडावर .पाचटावर लपुन बसतात . रात्री नर मादीचे मिलन होते .व नंतर मादी अंडी घालु लागते . अंडी घालन्याचे प्रमाण पण खुप म्हणजे पुंजक्याने असते .ऊसाच्या पाणाच्या मागे किंवा देठाच्या बाजुला अंडी घालत असते .१ मादी ५ ते ६ दिवस अंडी घालत असते तिच प्रमान कमीत कमी ५०० ते १००० अंडी घालायचे आहे . प्रथम ही अंडी डोळ्यांनी पण दिसत नसतात एवढी सुक्ष्म असतात ५ दिवसानंतर दिसु लागतात.नंतर अळी अवस्था चालु असते . हीच ऊसाचा मातृेकोंब आणि फुटव्यामधला मातृकोंब खात असते . अंदाजे १५ दिवसामध्ये ह्या अळ्या पुर्ण प्रौढ अवस्थेमध्ये येतात . त्यानंतर ही अळी ऊसाच्या खोडाला लहान छीद्र पाडुन आत प्रवेश करते व स्वताच्या विष्टेने ते छिद्र बंद करते . वेळीच उपाय नाही केला तर आतील सर्व कोंब महीन्या भरात खाऊन ५०ते ८० % नुकसान करू शकते .
२ ) कीडीचा प्रादुर्भाव –
खोडकिडीचा प्रादुर्भाव हा हलकी जमीण . कमी पाणी . ज्यास्त तापमान . दाट लागण असेल अशा ठिकाणी ज्यास्त दिसुन येतो .
३ ) उपाय –
कांदा . लसुन . पालक . या सारख्या अंतर पिकाणी याचा प्रादुर्भाव कमी करता येतो .
पण मका अंतर पिक असेल तर खोडकिड वाढु शकते .
प्रति एकर १० फेरोमोन सापळे लावल्यास नर अडकुन पडतो व पुढचे प्रजनन टाळता येते ..
४ ) जैविक व सेंद्रिय उपाय :
खोड किडीवर बिव्हेरिया बॅसियाना व मेटाराईझमचा स्प्रे पतंग व अंडी अवस्थेत असतांना घ्यावा त्यामुळे प्रभावी नियंत्रण मिळते.
आळी नाशक बाजरीच्या पिठापासून बनविलेले वापरावे.
हिरवी मिरची 2 kg , लसुण 2 kg , तंबाखू 2 kg
20 लिटर गोमूत्रात टाकून उकळून घ्यावे
द्रावण अर्धे होई पर्यंत उकळून द्यावे आणि मग वापरावे
प्रति पंप 75 ते 100 ml
लेखन-
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर.
B.Sc.Agri,M.Sc.Food Science & Tech.,P.G.D in Agri.Business.
संस्थापक अध्यक्ष,
तेजदिप शेतकरी,कृषी व कृषी पदविधर विकास संस्था,उंडाळे,ता.कराड, जि.सातारा.
मो.नं- 9021025147
महत्वाच्या बातम्या : –
पुन्हा एकदा कांद्याचे भाव गगनाला भिडणारे, सामान्य जनता नाखूष
डाळिंबावरील रोग आणि रोगाचे नियंत्रण कसे करायचे ते जाणून घ्या
जिवाणू स्लरी म्हणजे काय आणि ते कसे तयार करायचे जाणून घ्या