शेणखत – जमिनीची सुपीकता आणि पिकांचे भरघोस उत्पनाची हमी

0

शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीत शेणखत टाकणे खूप गरजेचे आहे. गाई शेण टाकतात ते जमिनीवर पडून तुडवले जाते आणि गाईचे त्यात गोमूत्र पडते व शेण वाळत असताना त्यात ते शोषले जाते. असे तयार झालेले शेणखत उत्कृष्ट प्रतीचे असते. उन्हाळ्याच्या शेवटच्या काही दिवसात हे शेणखत जमिनीत टाकले उत्कृष्ट प्रतीचा रिजल्ट मिळत आहे.

शेणखताचे फायदे-

1) सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे जमिनीत अन्नद्रव्ये उपलब्ध करण्यास मदत करणारे जिवाणू जसे ॲझाटोबॅक्टर, स्फुरद विरघळवण्यास मदत करणारे जीवाणू इ. इतर सूक्ष्मजीवांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते.

2) गांडुळांचा जमिनीतील वावर वाढतो.

3) जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

4) शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन भौतिक गुणधर्मांमध्ये लक्षणीय बदल होतात.

5) जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड-रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ॲझाटोबॅक्टर सह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.

6) जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्वसन वाढून मुळांद्वारे संश्लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.
7) पांढऱ्या मुळींची वाढ जोमदार होऊन पीक संपूर्ण हंगामात निरोगी असते.

8) पांढऱ्या मुळीची चांगली वाढ झाल्यामुळे झाडातील संजीवकांची निर्मिती आणि वहन चांगल्याप्रकारे होते.

9) जमिनीची पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होऊन जमिनीच्या सामूमध्येदेखील अपेक्षित बदल होतो.

लेखन-
श्रीविनायक दिलीपराव यादव-पाटील-उंडाळकर.
B.Sc.Agri,M.Sc.Food Science & Tech.,P.G.D in Agri.Business.
संस्थापक अध्यक्ष,
तेजदिप शेतकरी,कृषी व कृषी पदविधर विकास संस्था,उंडाळे,ता.कराड, जि.सातारा.
मो.नं- 9021025147

Leave a comment