
नरखेड परिसरात शेतकऱ्यांच्या आनंदाला उधाण; उजनीचे पाणी भोगावती नदीत आले
भोगावती नदीत उजनी धरणातील पाणी आले आहे. त्यामुळे भोगावती नदी परिसरातील गावागावांत भोगावती नदीत उजनीचे पाणी आले रे आले असे म्हणत शेतकऱ्यांच्या आनंदला उधाण आल्याचे पहायला मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रवक्ते तथा नरखेड जिल्हा परिषद गटाचे सदस्य उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री आजितदादा पवार व जयंत पाटील यांच्याशी भेट घेऊन घाटणे बॅरेज बंधारा सात फूट पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करून संबंधित विभागाला पाणी आडवण्यास भाग पाडले.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी आडले गेले. या पाण्याचे बॅक वॉटर सीना नदीतून भोगावती नदीत भोयरे नरखेड मार्गे डिकसळपर्यंत येऊन पोहोचले आहे. त्यामुळे कोरड्या ठणठणीत भोगावती नदी भीमा नदीचे पाणी आले आहे.
ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी आल्यामुळे मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील भोयरे, नरखेड, डिकसळ शिवारातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
परंतु याच पाण्यासाठी डिकसळ बंधाऱ्याच्या वरच्या भागातील डिकसळ, मसले चौधरी, देगाव, वाळूज शिवारातील शेतकरी घाटणे बॅरेज बंधाऱ्यातील पाणी बॕक वॉटरने मीळावे अशी मागणी करत आहेत.उमेश पाटील म्हणाले, देगाव, वाळुजपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत उजनीतून पाणी बंद करू नये अशी मागणी केली आहे.देगाव, वाळूजपर्यंत पाणी पोहोचेपर्यंत उजणीतून पाणी बंद करु नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी केल्याचे सांगितले.
महत्वाच्या बातम्या : –
लाल कांदा हृदयविकाराचा झटका आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करतो, त्याचे फायदे जाणून घ्या
मुर्रा म्हशीची ओळख कशी करता येणार, दुग्ध उत्पादन क्षमता व किंमत काय याची संपूर्ण माहिती
म्हशीच्या ‘या’ 4 जाती सर्वात जास्त दूध देऊ शकतात, वाचा संपूर्ण लेख
लिंबूवर्गीय फळझाडांमध्ये पिवळ्या पर्णछत्राची समस्या आणि उपाययोजना
रासायनिक खतांच्या अती वापराणे होणारे दुष्परिणाम