डाळिंब प्रक्रिया उद्योग करून शेतकरी कमाऊ शकतात दुप्पट नफा

0

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात गेल्या 5-7 वर्षापासून मोठ्या प्रमाणात डाळींब लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांनी आता या फळावर प्रक्रिया करून त्याचे बायप्रोडक्ट्स तयार करून विक्री केल्यास यात मोठ्या प्रमाणात फायदा होवू शकेल…

डाळिंबाचे जर औषधी आणि माणसाच्या आरोग्यासाठी असणारे गुणधर्म लक्षात घेतल्यास त्याच्या झाड, फांद्या, पाने, फुले व फळे आदी भागांच्या औषधी गुणधर्मामुळे या फळास अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.यामध्ये प्रामुख्याने खालील बायप्रोडक्ट्स बनविता येतात.

डाळिंब रस : डाळिंब रसाला मार्केट मध्ये चांगली मागणी आहे.

अनारदाणा : आंबट चव असलेल्या डाळिंब फळातील दाणे सुकवून तयार केलेल्या पदार्थास अनारदाणा असे म्हणतात. अनारदाण्याच्या आहारातील समावेशामुळे जीवनसत्व “क’ तंतुमय पदार्थ, लोह पोटॅशियम यासारखे पोषक तत्त्वे मिळतात.

सरबत : फळांपासून काढलेल्या नैसर्गिक रसामध्ये साखर, सायट्रिक आम्ल व पाणी मिसळून तयार केलेल्या पदार्थाला शरबत असे म्हणतात. हंगामाव्यतिरिक्त फळे उपलब्ध करण्यासाठी ती वेगवेगळ्या स्वरुपात साठवता येतात.

स्क्वॅश : फळांच्या गरयुक्त रसामध्ये गोडी आणण्यासाठी साखर मिसळून तयार केलेल्या पदार्थास स्क्वॅश असे म्हणतात. चांगली चव यावी, म्हणून साखर व आम्ल यांचे योग्य प्रमाण राखले जाते. स्क्वॅश वापरण्यापूर्वी पाण्यात योग्य प्रमाणात मिसळून पिण्यासाठी वापरतात.

सीरप : सीरपमध्ये रसाचे प्रमाण 40 टक्के असते. साखरेचे प्रमाण 65 ते 70 टक्के असते. सीरपमध्ये अन्नसंरक्षक मिसळण्याची आवश्यकता नसते. परंतु, अधिक काळ टिकवण्यासाठी 600 ते 700 पीपीएम सोडियम बेल्झाेएट मिसळावे.

सालीपासून पावडर : डाळिंब फळाच्या सालीमध्ये औषधी गुणधर्म असतात. अनारदाणा, ज्यूस, स्कॅशनिर्मितीतील शिल्लक सालीचा उपयोग पावडर तयार करण्यासाठी हाेऊ शकेल. सालीचे प्रमाण 20 टक्के असते. सालीत 30 टक्के टॅनिन असते. यास वाळवून पावडर बनवता येते.

साल उन्हामध्ये अथवा ड्रायरमध्ये 50 ते 55 अंश से. तापमानाला वाळवून घ्यावी. नंतर त्याची दळण यंत्राच्या साहाय्याने पावडर तयार करून 60 मेसच्या चाळणीने चाळून घ्यावे. चाळून घेतलेली पावडर हवा बंद पिशव्यांत पॅक करून लेबल लावावी.

या प्रोडक्ट्स मार्केट मध्ये मागणी सुद्धा चांगली आहे.जर यापैकी ज्यूस ला मिळणारे दर जर पहिले तर डाळिंबाचा ज्यूस- 120 रुपये प्रति लिटर -तयार पेय- 20 रुपये प्रति 250 मिलि बॉटल साधारण असा दर मिळतो.

या उद्योगासाठी योग्य रीतीने मार्केटिंग चे नियोजन केल्यास यामधून खूप चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकेल. हा प्रकल्प शेतकरी आपल्या शेतावर सुद्धा सुरु करू शकतो आणि सुरवातीला कमी इन्व्हेस्टमेंट करून हा उद्योग सुरु करता येईल.

महत्वाच्या बातम्या : –

कांदा लागवड ते कांदा काढणी व्यवस्थापन

राजस्थानमध्ये शेतकऱ्यांना व्याजाशिवाय मिळणार कर्ज आणि 50 हजार सौरपंप

CZC-94 नवीन जातीचे जिरे 90 ते 100 दिवसात होईल तयार, लागवडीचा खर्च होईल कमी

खजूर शेतीसाठी उचला 75 टक्के अनुदानाचा लाभ

नस दाबली गेली असल्यास ‘हे’ घरगुती उपाय एकदा नक्की करून पहा

Leave a comment