नोकरीच्या मागे न लागत ‘या’ शेतकऱ्याने निवडला शेतीचा पर्याय, केली पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड

0

कलिंगड हे एक मोठे, हिरव्या रंगाचे, लाल पाणीदार गोड गर असणारे फळ आहे. या वनस्पतीला संस्कृतमध्ये काालिन्द असे नाव आहे. हे फळ उन्हाळ्यात मिळते.

एके काळी कलिंगडे बहुधा एप्रिल, मे महिन्यातच फळबाजारात किंवा हातगाडीवर मिळत असत. मात्र पुढेपुढे लहान-मोठय़ा रस्त्यांवर ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून ते थेट मे, जून महिन्यापर्यंत विक्करीला आलेली कलिंगडे आणि त्याच्या लाल लाल फोडी रस्त्यावरून जाणार्‍यांना भुरळ पाडतात.

कलिंगड खाल्ल्यावर उन्हाळ्यात बर वाटतं. ९७ टक्के पाणी असलेलं हे फळ शरीरात ग्लुकोजची लेव्हल पूर्ण करतं. पण आता याच लाल कलिंगडांमध्ये एक नवीन प्रकार आलायं तो म्हणजे पिवळ्या कलिंगडाचा. हा इस्रायलचा प्रकार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

हल्लीचा शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन प्रयोग करणाऱ्यांतील असून त्यातून ते शेती अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

असाच एक नवीन प्रयोग केलायं कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कोरहळी गावातल्या बसवराज या तरुण शेतकऱ्याने. हा तरुण ग्रॅज्युएट आहे. पण नोकरीच्या मागे न लागत या तरुण शेतकऱ्याने शेतीचा पर्याय निवडला, जेवढं कष्ट एखाद्या कंपनीसाठी करणार तेवढंच माझ्या शेतीसाठी केलं तर वर्षाला १० एकर शेती घ्यायला कमी करणार नाही.

मग या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड केली. जेव्हा कलिंगडं तयार झाली आणि त्यातलं एक कलिंगड कापून दाखवलं तेव्हा बघणारे सगळेच चकित झाले. कारण आतला गर हा लाल रंगाच्याऐवजी पिवळ्या रंगांचा असल्याचे दिसून आले.

पिवळ्या कलिंगडाचं उत्पादन घ्यायला कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांच्या आधी पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मालवण, पालघरमध्ये ही पिवळ्या कलिंगडं शेती केली जात आहेत.

याआधी मालवणच्या आचरा गावातील तरुण विक्रांत आचरेकर यांनी हा प्रयोग केला आहे. पोलीस भरतीची तयारी करताना लॉकडाऊनमध्ये मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावत त्यांनी विशाला, आरोही, शुगरक्कीन, ममद अशा चार प्रकारच्या कलिंगडांची लागवड केली होती. ज्यातून त्यांना देखील चांगलं उत्पन्न मिळालं असल्याचं सांगण्यात आलं. तर वाडा तालुक्यातील देवघर गावचे शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनीही पिवळ्या कलिंगडाची लागवड केली होती.

महत्वाच्या बातम्या : –

कोकणात एका प्रगतशील शेतकऱ्याने केले चक्क लाल भेंडीचे संशोधन

शिंगाड्याचे औषधी उपयोग तुम्हाला माहित आहे काय ?

करडांना होणारे सर्वसाधारण आजार, लक्षणे व त्यावरील उपाय

कोंबडी आणि बदके वगळता २८० अंडी देणाऱ्या ‘या’ पक्षीचे पालन करा, मिळेल कमी किंमतीत अधिक नफा

सामान्य दिसणारी ब्राह्मी आहे खूप खास, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Leave a comment