मातीची उत्पादन क्षमता वाढण्यासाठी व पिकांचे उत्पादन वाढण्यासाठी आवश्यक घटक

0

आधी पाहुयात आपण आज पिकास काय देत अहोत…….

1. 10.26.26 – NPK
2. DAP – NP
3. 12 :32:16 – NPK
4. 0: 52: 34 – PK
5. युरिया – N

याचा अर्थ आपण पिकाला फक्त 3 मुख्य अन्न द्रव्यच देत अहोत. मात्र पिकाला एकूण 16 अन्न घटक लागतात

1. हवेतून 3 मिळतात – C.H.O
2. मुख्य अन्न घटक 3 – N.P.K
3. दुय्यम अन्न घटक 3 – Ca. Mg. S.
4. सुक्ष्म अन्न घटक 7 – fe. Zn. B. Cl. Cu. Mo. Mn

उत्पन्न कमी होण्याचे मुख्य कारण. पिकाला आवश्यक घटक न देणे. मातीच्या सुपिकतेसाठी आवश्यक घटक

1. जिवाणु
2. गांडूळ
3. अन्न घटक 16
4. पाणी
5. हवा
6. सेंद्रिय कर्ब (ह्यूमस)
7. जमिनीचा सामू( Ph)
8.C:N ratio
9.EC लेवल
10.CEC लेवल

परंतू आज आपण मातीत काय देत अहोत? फक्त 3 मुख्य अन्न घटक. ते पण रासायनिक खतांच्या माध्यमातून. याचा दुषपरिणाम म्हणजे जमिनीतिल जीवाणु , गांडूळ संपले. जीवाणु संपल्यामुळे जमिनित हवा जात नाही, पाणी मूरत नाही, त्यामुळे जमिनीतिल सेंद्रिय कर्ब कमी झाला. याचा परिणाम मातीची सुपिकता कमी झाली व उत्पन्न घटले.

जर मातीची सुपिकता व उत्पन्न वाढवायचे असेल तर, सेंद्रिय औषधे वापरावे लागतील. सेंद्रिय खते व औषधे, मनुष्य, पीक किंवा मातीला हानिकारक नाहीत.
या मध्ये असणारे सर्व घटक आहेत जे तुमची जमीन / माती सुपीक करण्याला मदत करतील व तुमचे पीक जोमाने वाढेल.

महत्वाच्या बातम्या : –

ब्लैकबेरी मधुमेहसह अनेक आजरांसाठी फायदेशीर, त्याचे सेवन करण्याचे फायदे जाणून घ्या

केळी लागवड व खोडवा

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीतुन मिळू शकतो आराम , शेणपासून बनवलेले नेचुरल गैस CNGचा होणार उपयोग

यवतमाळच्या बाजारावरील निर्बंध आणखी आठ दिवस कायम

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समिती मधील भाज्यचे दर स्थिर

Leave a comment