निंबोळी अर्काचा किडीवर होणारा परिणाम

0

पानांवर निंबोळी अर्काची फवारणी केल्यामुळे पाने कडू बनतात आणि अशी पाने खाणे टाळतात किडीची उपासमार झाल्यामुळे शेवटी त्या किडी मरतात.

अंडी घालण्याच्या प्रक्रियेत अडथळा

कडू वासामुळे पिकाच्या पानांवर फुलांवर कोवळ्या शेंड्यावर मादी कीटक अंडी घालत नाही त्यामुळे पुढील पिढी तयार होण्यास अडथळा निर्माण होतो.

प्रजोत्पादन प्रक्रियेत अडचण येणे

निंबोळी अर्काचा फवारणी मुळे किडीमध्ये नपुसकता येते तर मादी मध्ये लिंग आकर्षण कमी मी होते परिणाम पुढील पिढी तयार होण्याचे प्रमाण कमी होते.

पिकापासून परावृत्त करणे

निंबोळी अर्काचा कडू वासामुळे कीड जवळ येणे टाळते कात टाकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत बाधा येणे किडीची नैसर्गिक वाढ होताना होळी अगर पिल्लू अवस्थेत शरीर वाढीसाठी नियमित कात टाकते आवश्यक असते निंबोळी अर्काच्या फवारणीमुळे त्यात व्यत्यय येतो.

अविकसित प्रौढ तयार होणे

अशा अवस्थेतून निघालेल्या प्रौढ पिढीमध्ये विकृती अपंगत्व येणे अविकसित पंख तयार होणे इत्यादी प्रकार आढळतात त्यात बरोबर प्रजोत्पादन क्षमता मंदावते आणि पुढील संभाव्य नुकसान कमी होऊ शकते.

कालावधी कमी होणे

निंबोळी अर्काचा संपर्कात आलेल्या किडीच्या विविध अवस्थांवर घातक परिणाम होऊन त्याचा जीवन कालावधी कमी होतो.

निंबोळी अर्क वापरण्याचे फायदे

– निर्मिती खर्च अतिशय कमी असतो

– नैसर्गिक असल्याने प्रदूषण होत नाही

– निंबोळी अर्क हाताळणे व वापरणे सोपे आहे

– घातक किडींना प्रतिबंध/नियंत्रण करत असले तरी नैसर्गिक शत्रू मित्र कीटकांसाठी फारसे हानीकारक ठरत नाही ही रासायनिक कीटकनाशकांमुळे होणारे दुष्परिणाम टाळून पर्यावरणाचा समतोल राखला जातो.

– निंबोळी अर्क वापरल्या मुळे जमिनीत सुत्रकृमी मुळे कुरतडणाऱ्या अळ्या नियंत्रित होतात निंबोळी अर्कामुळे पिकावरील विविध किडींच्या मादी अंडी घालण्यापासून परावृत्त होतात.

– निंबोळी अर्क पिकावर फवारणी साठी वापरला असता पांढरी माशी मिलीबग लष्करी अळी तुडतुडे फुलकिडे कोळी इत्यादी प्रकारच्या किडींना खाद्य प्रतिबंध करतो कडुनिंबतील आझाडिरेक्टईन हा घटक किडींची वाढ थांबवतो तसेच कात टाकण्यास प्रतिबंध करतो त्यामुळे कीड गुदमरून मरण पावते‍

जैविक शेतकरी                                                                                                                                शरद केशवराव बोंडे                                                                                                                         ९४०४०७५६२८

महत्वाच्या बातम्या : –

पोटॅशियम शोनाईट म्हणजे काय ? त्याची वापरण्याची पद्धत व फायदे

‘हे’ आजार असलेल्या लोकांनी चुकूनही फुलकोबी खाऊ नये अन्यथा….

तुम्हाला माहित आहे गायीच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये काय फरक आहे ? कोणचे दूध आरोग्यासाठी फायदेशीर जाणून घ्या

डाळींब बागांचे उन्हाळी व्यवस्थापन

खोडकीड कीडीचा प्रादुर्भाव कसा होतो व त्यावरील काही उपाय

Leave a comment