पावसामुळे सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे नुकसान

0

मध्यरात्री झालेल्या पावसाने अनेक जिल्ह्यांना फटका बसला आहे. सांगली व सोलापूर जिल्ह्यात द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसह आंबा व झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात चार द्राक्षबागा कोसळून शेतकऱ्याचे सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातही ज्वारी, हरभरा, भाजीपाला पिकांचेही नुकसान झाले असून, ज्वारी व कडबा काळा पडण्याची भीती  शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विदर्भातही पावसाने तडाखा दिला. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती जिल्ह्यात गारपीट झाली. हरभरा, गहू, कापूस, संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भोकरदन तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली.सर्वत्र गारांचे खच साचले होते.

नाशिक जिल्ह्यालाही अवकाळीचा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळसह नवापूर तालुक्यात गारपीट झाली.

आज म्हणजेच १९ फेब्रुवारी २०२१ रोजी  पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : –

राज्यात रुग्णवाढीने चिंता, गेल्या २४ तासात ५,४२७ रुग्णांची वाढ

मायकोरायझा म्हणजे नक्की काय जाणून घ्या…

मोहरी बियाणे पेरणी आणि कापणी कसे करावे? जाणून घ्या

आता तहसील किंवा पंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही, अशा प्रकारे घरबसल्या भरा जिमीचे भाडे

पुढचे तीन दिवस ‘या’ जिल्ह्यात गाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

 

Leave a comment