करडांना होणारे सर्वसाधारण आजार, लक्षणे व त्यावरील उपाय
१)अचानक मरतुककारण :- जीवाणू.विषाणू. परोपजीवी.
कारणीभुत बाबी:-गोठ्यातील घाण.व खराप पाणी. चिकाचा अभाव
लक्षणे:-काही वेळा कोणत्याही लक्षणे न दाखवता मरतुक.पातळ संडास. शात उभे राहणे. अशक्तपणा.
प्रतिबंधक उपाय:- सुधारित आरोग्य व व्यवस्थापन व चागली निगा.शेळीला गर्भावस्थेत सकस आहार.करडू शेळीस पित नसेल तर बाटलीद्वारे दुध/चीक पाजणे. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर.
२)नाळेचा आजार (नेव्हल इल)कारण:- जीवाणूकारणीभूत बाबी- आरोग्यद्रुष्ट्या अस्वस्थता. गोठ्यामधील गर्दी. नाळ कापताना खराप व घाण बेल्ट.सुरी. कात्रीचा वापर.
लक्षणे:- ताप यणे.नाळेच्या जागी सूज येणे.भूक न लागणे.खाण्याची इच्छा न होणे.परिणाम माशा आसाडी घालून आळ्या पडतात. व हर्निया होतो.व पिलू मरते.
प्रतिबंधक उपाय:-सुधारित आरोग्य व व्यवस्थापन आणि चांगली निघा.
३)कुपोषित कारण:-चिकापासून वंचित राहणे.दुध कमी मिळणे.
कारणीभूत बाबी:-गाभण काळात शेळीची काळजी न घेणे.गर्भवस्थेत शेळीचे आजार पण व कुपोषण ल कँल्शियमची कमतरता.
लक्षणे:- तोंड कोरडे पडणे.अशक्तपणा. ताप किंवा पिल्लू थंड पडणे.पोट खोल जाणे.
प्रतिबंधक उपाय:-गर्भावस्थेत सकस आहार तसेच आजारी असल्यास वेळेवर उपचार करणे.थंडी पडल्यावर गोठ्याच्या मोकळ्या बाजूने पोती लावणे.कँल्शियम पाजणे.करडास उबदार जागी ठेवणे.गोठ्यात बल्ब लावणे.एखाद्या शेळीस जास्त चीक असल्यास तो गोठवून ठेवणे.व अशा करडांना गरजेप्रमाणे कोमट करुन पाजणे.एकदा पातळ केलेला चीक परत वापरू नये.
४)गुदमरणे कारण:- विण्याच्या क्रियेशी संबंधित.
कारणीभूत बाबी:-शेळी विण्याच्या जागी शेळ्यांची गर्दी.गर्भाशयाची स्पंदने कमी होणे.अरुंद योनीमार्ग व विताना करडू वेडेवाकडे येणे यामुळे शेळी विताना अडते.व करडू गुदमरते.
लक्षणे:-तडफडणे.कोणतेही लक्षण न दाखवता मरतूक.श्वास न घणे.किंवा मेलेले करडू भाहेर येणे.
प्रतिबंधक उपाय:-शेळी विताना अडल्यास मदत करणे.पिल्लू वेडेवाकडे असल्यास सरळ करून मगच बाहेर ओढणे.विण्याच्या जागी गर्दी कमी करणे. पशुवैद्यकाची मदत घेणे.
५)काँक्सिडि-ओसिस कारण:-काँक्सिडिया परोपजीव.कारणीभूत बाबी:-कोपोषण. आरोग्यदृष्ट्या अस्वच्छता करडांची निगा व वज व्यवस्थित न ठेवणे.
लक्षणे:- पाठीची कमान करून उभे राहणे. घाण वास येणारी पातळ संडास.कधी कधी रक्तमिश्रित संडास होणे.अस्थिरपंजर होणे.
प्रतिबंधक उपाय:- चांगली निगा सुधारित व्यवस्थापन व आरोग्य आजारी करडे वेगळी काढणे लेंडी तपासून निदान करणे योग्य उपचार करणे. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार औषध उपचार.
६)न्युमोनिया कारण:- जिवाणू. विषाणू.बुरशी.
कारणीभूत बाबी:- चुकीचा कोंदट गोठा. हवेमधील जास्त बाष्प व गारवा पावसाळा. बुरशीयुक्त खाद्य.ताण व अशक्तपणा. खेळत्या हवेचा अभाव.
लक्षणे:- सर्दी खोकला ताप डोळ्यातून पाणी.
प्रतिबंधक उपाय:- स्वच्छ व कोरडा गोठा पुरेशी खेळती हवा गोठ्यातील मलमूत्र सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा.पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर.
७)हगवण कोलाय-बँसिलोसिस कारण :-जीवाणू.
कारणीभूत बाबी:- कुपोषण.बुरशीयुक्त खाद्य चांगल्या व्यवस्थापनाचा अभाव मैला व सांडपाण्याचा निचरा न होणे.
लक्षणे:- पातळ संडास.भूक न लागणे. ताप.
प्रतिबंधक उपाय:- आजारी करडांना वेगळे करून उपचार करणे. सुधारित आरोग्य व व्यवस्थापन.करडांसाठी सहज उपलब्ध होईल असे पिण्यासाठी स्वच्छ पाणी. पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार प्रतिजैविकांचा वापर.
८)गोचिड पिसवांचा प्रादुर्भाव कारण:-परोपजीवी.
कारणीभूत बाबी:- जास्त काळ गोठ्या मधील मोठ्या शेळ्यांमध्ये गोचीड पिसवांचा प्रादुर्भाव.अस्वस्थता. गर्दी दलदल.
लक्षणे:- खाजवणे. पंडुरोग.केस जाणे. अशक्तपणा.अंगवर पिसवा दिसतात का गोचिड दिसतात. खरुज दिसते.
प्रतिबंधक उपाय:- करडांना समप्रमाणात राख व 50 टक्के कार्बारिल पावडर मिसळून अंगावर चोळणे. जास्त प्रादुर्भाव झाल्यास 1 लिटर पाण्यामध्ये 2 मिली ब्युटाँक्स किंवा मेगासाईड औषध टाकून शेळ्या व करडांना अंघोळ घालावी.शेळ्या परत गोठ्या सोडण्यापूर्वी गोठ्यातील जमीन जाळून घ्यावी.कीटकनाशकाचा वापर अतिशय सावधपणे करावा व चाटून विषबाधा होणार नाही याची काळजी घ्यावी झाल्यास पशुवैद्य शी संपर्क साधावा.
९)पोटसूळ कारण:- जास्त दूध जिवाणू विषाणू.
कारणीभूत बाबी:- जास्त दूध देणाऱ्या शेळीला एकच करडू झाल्यास. करडांना दूध पिण्यासाठी सोडल्यास लक्ष देणे.
लक्षणे:- कण्हणे. पाठीची कमान होणे.सारखे सारखे संडास आल्यासारखे करणे व ओरडणे. पोटामध्ये संडासचे गुठळी तयार होणे.
प्रतिबंधक उपाय:-ग्राईप वॉटर एक चमचा दिवसातून तीन वेळा. तसेच मापारी सरांच्या फार्मूल्यांने एनिमा करणी.(2 मिली ऐरडी तेल व सोडियम फाँस्फेट एनिमा सलाईन 50/100 मिलीचा एनिमा करणे.
लहान करडांचे संगोपन
मरतूक:- लहान करडांची वाढ झपाट्याने करण्यासाठी त्याचे संगोपन अति दक्षतेने करावी.पहिल्या एक ते दीड महिन्यात करडांची मरतूक मोठ्या प्रमाणात होते.
कारण:-
१) गाभण काळात शेळीची योग्य ती काळजी न घेणे त्यामुळे करडे कमजोर जन्माला येणे.
२) करडांना दूध कमी मिळणे.
३) करडांना दूध जास्त होणे.
४) करडे माती खाणे. यासाठी दररोज शेळीपालकांनी सकाळ-संध्याकाळ करडांची बारकाईने काळजी घेणे आवश्यक आहे. अस्वच्छ परिसरामुळे व माती खाल्ल्यामुळे होणारा जनताच आणि रोगाचा प्रादुर्भाव कारडांची मरतूक वाढवतो.दूध पाजण्यासाठी अस्वच्छ भांड्याचा वापर करू नये. दूध पाजण्याची बाटली रोज गरम पाण्याने धुऊन घ्यावी. गोठ्यात करडांना पुरेशी जागा असावी गर्दी होऊ नये. त्यांच्या गोठ्यात पुरेसा सूर्यप्रकाश असावा. त्यांच्या गोठ्यात हवा खेळती असावी.
संगोपन:- करडू जन्मलेल्या नंतर करडाच्या तोंडावरील पातळ द्रव्याचा पडदा पुसून बाजूला करावा. असे करुन करडाला श्वासोश्वास घेता येईल.व शेळीने त्यांला चाटून साप केले नाही. तर आपण स्वोच्छ कापडाने पुसून घ्यावे. करडू जन्मल्यानंतर हालचाल करत नसल्यास मागील पायाला धरून उलटे करावे व एका हाताने छातीवर हलकासा दोन ते पाच मिनिटां पर्यंत दाब द्यावा जेणेकरून करडाला श्वासोश्वास घेण्यास मदत होईल.
करडू जन्माला आल्यानंतर ३/४ इंचावरुन नाळ निर्जंतुक कात्रीने कापून पुढील टोक स्वच्छ व निर्जंतुक दोर्याने बांधून घ्यावे. व नाळेच्या टोकाला आयोडीनचा बोळा लावा.कडू जर धष्टपुष्ट असेल तर ते उभे राहण्याचा प्रयत्न करते. किंवा आपण त्याला उभे राहण्यास मदत करावी. करडू जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत आईचा पहिला चिक पाजणे अत्यंत आवश्यक असते.
सुरुवातीला सडा चीची फोडून कार्डाच्या तोंडात द्यावी कर डाला वजनाच्या 10 टक्के चीक पाजावा.करडू कमजोर अशक्त असल्यास चिक काढून पाजावा.करडांना पहिल्या महिन्यात वजनाच्या 10% दूध पाजावे तसे दुसऱ्या महिन्यात 8% व तिसऱ्या महिन्यात 5% दूध पाजावे. तीन महिने किंवा वजन 11 किलो होईपर्यंत करडांना दुध पाजावे.करडांना पहिली 8 दिवस आई सोबत ठेवावे पण शेळीच्या कासेला पिशवी बांधावी.
जर शेळी दूध देत नसेल किंवा दूध पाजण्यास सहाय्य करत नसेल तर करडांना बाटलीने दूध पाजावे अथवा दुसर्या शेळीला पाजावे अथवा गाईचे दूध पाजले तरी चालते.करडांना 15 ते 20 दिवस पाणी पाजू नये.करडे गोठ्यात माती खाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. त्यासाठी गोठ्यात शेणाने सारवून घ्यावे.किंवा फरशी किंवा कोबा गोठ्यात असावा. तसेच चाटण विटा लटकवून ठेवाव्यात.
करडांची दर पंधरा दिवसाला वजने करावी त्यामुळे वाढ कशी होत आहे हे कळेल. त्यामुळे वाढ होत नसलेली पिल्ले आपण विक्री करून त्यावर होणारा अनावश्यक खर्च आपण टाळू शकतो.पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार तीन महिन्या पुढील करडांना योग्य ते लसीकरण करून घ्यावे.करडना पहिला महिना पूर्ण झाल्यावर व नंतर तीन – तीन महिन्यांनी जनताचे योग्य ते औषध बदलून बदलून पाजावे.
तीन महिन्यानंतर पाटी व बोकड वेगळे करावेत.त्यामुळे चुकून एखादी पाट कमी वयात भरली जाणार नाही. चार किंवा पाच महिन्यात बोकडांचे खच्चीकरण करावे व खच्चीकरण केल्यानंतर व जंतुनाशक डोस दिल्यानंतर पाच ते सहा दिवस लिवर टॉनिक करताना द्यावे.करडांची वाढ झपाट्याने होण्यासाठी व भूक वाढीसाठी पंधरा दिवसातून 5 दिवस करडांना लिव्हर टॉनिक द्यावे.तीन महिन्यापर्यंत करडांना कमी प्रतीचा चारा देऊ नये.
महत्वाच्या बातम्या : –
कोंबडी आणि बदके वगळता २८० अंडी देणाऱ्या ‘या’ पक्षीचे पालन करा, मिळेल कमी किंमतीत अधिक नफा
सामान्य दिसणारी ब्राह्मी आहे खूप खास, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे
गावातल्या कचऱ्यापासून कंपोस्ट बनवत शेतकरी कमवत आहे चांगले उत्पन्न
विदर्भात काही भागांत हलक्या पावसाचा इशारा
कांद्याच्या दरात घट होण्याची शक्यता