सुती कपडा जमिनीत पुरून तुम्ही देखील जाणून घेऊ शकता जमिनीची सुपीकता; कश्या प्रकारे केला जातो हा प्रयोग वाचा

0

जमिनीची सुपीकता किती आहे आणि त्यामध्ये कोणते घटक किती प्रमाणात उपलब्ध आहे हे तपासण्यासाठी मोठी प्रयोगशाळा लागते. अगदी काही मोजके आणि महत्वाचे घटक तपासणीसाठीही माती-पाणी परीक्षण कीटची गरज आपल्यला असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक सोपी अशी पद्धत सांगणार आहोत ज्याद्वारे अगदीच सहज आपण देखील जमिनीची सुपीकता आणि त्यामधील जीवाणू यांची माहिती मिळवू शकतो आता ते कसे हे जाणून घ्या….

तो प्रकार म्हणजे सुती कपडा हा जमिनीत पुरून ठेवण्याचा. सध्या न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बड्या देशात हा प्रकार वापरला जात आहे. येथे सिटिझन सायन्स नावाच्या प्रोजेक्ट अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना सुती कपडे जमिनीत पुरण्यासाठी दिले जात आहे आणि त्याद्वारे जमिनीचा सुपीकता निर्देशांक तपासाला जात आहे.

टी-बॅग आणि कपडा जमिनीत पुरला जातो आणि मग जमिनीत पुरलेले कपडे एकआठवड्यानंतर नाही तर  महिन्यानंतर काढून पाहिले जातात. कपडा किती जीर्ण आणि नष्ट झाला आहे त्यावरूनही सुपीकता लक्षात येते.

प्रयोगातील महत्वाचे मुद्दे

  • हा प्रयोग न्युझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही बड्या देशात राष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आला आहे. शेतकऱ्यांबरोबरच शालेय विद्यार्थीही या प्रयोगात सहभागी झाले आहेत.
  • सूत किंवा कपाशी एक प्रकारच्या सेल्युलोजपासून तयार होते. त्यामुळे सुती कपडा जमिनीतील जिवाणूंसाठी एक स्वादिष्ट भोजन ठरतो असे बोलले जाते.
  • जिवाणूंचा या कपड्यावर हल्ला होताे. त्यात कपडा नष्ट होऊ लागतो. कपडा नष्ट झाल्यास अशा मातीत सर्व पोषक घटक अस्तित्वात असल्याची ती खूण आहे.
  • जमिनीतून काढलेल्या कपड्याचे डिजिटल विश्लेषणही केले जाते. त्यातून मातीची गुणवत्ता कशी आहे, ती किती सुपीक आहे हे तपासले जाते.
Leave a comment