वांगी पिकातील मर रोग व शेंडे अळी

0

समस्या आणि उपाययोजना

वांगी पिकाचे उत्पादन संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर घेतले जाते. तसेच एकदा लागवड केल्यावर त्याच पिकाचे उत्पादन एक ते दीड वर्ष घेण्याचा प्रघात आहे. त्यामुळे जास्त काळासाठी एकाच जमीनीत एकच पीक राहिल्याने यामध्ये सूत्रकृमी, मर रोग, खोड अळी आणि शेंडे अळीचा मोठ्या प्रमाणत प्रादुर्भाव होतो.

• पहिली समस्या म्हणजे जिवाणूजन्य आणि बुरशीजन्य मर यामध्ये संपूर्ण झाडाची पाने पिवळी पडून करपणे, झाडाची वाढ खुंटणे. झाडाची मुळे कुजणे अशी लक्षणे दिसून येतात
• अळीचा प्रादुर्भाव असेल तर खोड किंवा शेंडा पोखरल्यामुळे त्यापुढील भाग अचानक सुकून जातो तसेच फळांना कीड लागलेली दिसून येते.
• सूत्रकृमींचा प्रादुर्भाव असेल तर झाडाच्या मुळांवर गाठी दसून येतात. तयार झालेल्या गाठींमुळे झाडाच्या मुळांमधून अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे झाडाची पाने हळूहळू पिवळी पडून वळायला लागतात.
• या सगळ्या समस्यांमुळे वांगी पिकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होतो आणि नियंत्रणासाठी घेतलेल्या उपाययोजनांवर खर्च तर वाढला जातो परंतु पाहिजे त्या प्रमाणात सुधारणा दिसून येत नाही.
• त्यात आता पुढे पावसाळ्यात तर अतिरिक्त पाण्यामुळे मर रोग आणि शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणे काहीसे अवघड जाईल
• त्यामुळे या सगळ्या समस्यांवर सुरुवातीपासूनच म्हणजेच प्रतिबंधक उपाययोजना करणे गरजेचे आहे
• यासाठी वांगी पिकाच्या लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून जमिन चांगली उन्हात तापवून द्यावी. जेणेकरून जमीनीतील कीड, रोग आणि सूत्रकृमी नियंत्रित होण्यास मदत होईल.
• सुरुवातीला बेसल खतांची मात्रा देताना त्यासोबत २०० किलो निंबोळी पेंड, पोॅली शिल्ड बुरशीनाशक ५०० ग्रॅम प्रति एकर जमिनीतून द्यावा.

महत्वाच्या बातम्या : –

सुर्यफूल लागवडीची संपूर्ण माहिती

खरबुज लागवड बद्दल आधुनिक माहिती

जाणून घ्या उन्हाळी बाजरी लागवड बद्दल संपूर्ण माहिती

सागवृक्ष लागवड व संवर्धन माहिती

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना: इथं क्लिक करून पाहू शकता 7.5 HP पंपाचे वेंडोर सिलेक्शन

Leave a comment