नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान देणार – अजित पवार
‘‘नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची सरकारची भूमिका आहे. मात्र, कोरोना महामारीमुळे सध्या आर्थिक चणचण आहे. ही अडचण दूर झाल्यानंतर जे सभासद बँक कर्ज नियमित फेडतील, त्यांना भविष्यात याचा निश्चित लाभ होईल. त्यामुळे सभासदांनी बँकेचे कर्ज भरून सहकार्य करावे,’’ असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इंदापूर तालुका विभागीय कार्यालय व जुना पुणे- सोलापूर महामार्गावरील नुतन शाखा इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सोनाईप रिवाराचे अध्यक्ष दशरथ माने, बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्ष अर्चना घारे, संचालक अप्पासाहेब जगदाळे, दिगंबर दुर्गाडे, ॲड. संजय काळे, आत्माराम कलाटे, मदनराव देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, ‘‘इंदापूर येथे जुन्या पुणे- सोलापूर महामार्गालगत २० गुंठे जागा घेऊन त्यावरील १४ हजार चौरस फूट जागेत १ कोटी १८ लाख रुपये खर्च करून शहर वैभवात भर टाकणारी सुसज्ज इमारत उभी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होणार आहे. बँकेत नोकरभरती झाली असली, तरी आणखी कर्मचाऱ्यांची गरज आहे. त्यामुळे मेरिटनुसार संधी दिली जाईल.’’
महत्वाच्या बातम्या : –
काका पुतण्याच्या जोडीनं अनोखा प्रयोग करत पनवेलमध्ये केली स्ट्रॉबेरीची शेती
पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांना पाठवण्याची तयारी सुरु
तब्बल १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात लावण्यात आले साैरकृषीपंप
‘या’ १५ कृषी यंत्रांवर ५०% अनुदान मिळवा
महाराष्ट्रातील विविध भागात चिंच ५००० ते १२५०० रुपये क्विंटल