कोरोना काळातही शेती क्षेत्रात ११.७ टक्के वाढ अपेक्षित
कोरोनामुळे २०२० हे संपूर्ण वर्ष सर्वच क्षेत्रांसाठी कठीण गेलं. त्यातही लघु उद्योग आणि बाजारपेठेवर याचा मोठ्या प्रमाणावर विपरित परिणाम झाला. मात्र, असं असताना महाराष्ट्रातल्या कृषी क्षेत्रानं सकारात्मक वाढ दर्शवली आहे.
तीन प्रमुख आधार क्षेत्र असलेल्या सेवा, कृषी आणि उद्योग क्षेत्रांपैकी कृषी हे एकमेव असं क्षेत्र ठरलंय जिथे वाढ झाली आहे. तीही ११.७ टक्के इतकी दुसरीकडे उद्योग क्षेत्रात वजा ११.३ टक्के तर सेवा क्षेत्रात वजा ९.० टक्के इतकी वाढ दर्शवण्यात आली आहे. ८ मार्च रोजी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे.
दरम्यान, शेती क्षेत्रासोबतच संबंधित क्षेत्र असलेल्या पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी आणि मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती या क्षेत्रांमध्ये अनुक्रमे ४.४ टक्के, ५.७ टक्के आणि २.६ टक्के अशी वृद्धी अपेक्षित आहे.
कोरोना काळात एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. यामध्ये देशाचा आर्थिक विकासदर हा वजामध्ये गेला असून राज्यामध्येही काहीशी तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. आर्थिक पाहणी अहवालात नमूद केल्याप्रमाणे २०२०-२१च्या पूर्वानुमानानुसार देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत देखील उणे ८.० टक्के वृद्धी अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या : –
तीन वर्षांत अडीच पटीने वाढले मक्याचे क्षेत्र, ४ हजार ५३४ हेक्टर क्षेत्रांवर मक्याची लागवड
नागपूरमध्ये उन्हाचा तडाखा हळूहळू वाढायला सुरवात
रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे
तेजपानचे फायदे जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, एकदा वाचाच