पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे एकदा जाणून घ्या…

0
पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे एकदा जाणून घ्या…

 केळी
1) केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात.
2) झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडतात.

 वांगी 
1) गंधकाची कमतरता असल्यामुळे झाडांची अपरिपक्व फुले गळतात, उत्पादनात घट होते.
कोबी
1) कमतरतेमुळे नवीन पानाचे काठ पिवळे पडतात.
2) नवीन पानांचा आकार चमच्याच्या किंवा कपासारखे होऊन निमुळता होत जातो. त्यामुळे गड्डा तयार होत नाही.
फ्लॉवर 
1) फुलकोबी गंधकाच्या कमतरतेची अतिशय संवेदनशील आहे.
2) लागवडीपासून एक महिन्याच्या आत पानाच्या कडा पिवळसर पडून खाली निमुळत्या होतात.
3) गंधकाच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट होते.
हरभरा
1) पानांची टोके पिवळसर हिरव्या रंगाची होतात. कमतरतेमुळे पानाला लाल रंग येतो.
2) नवीन अपरिपक्व पाने वाळतात व झाडांच्या शाखा व्ही आकाराच्या होतात.
मिरची
1) गंधकाच्या कमतरता असल्यामुळे झाडांना फुलधारणा उशिरा होऊन फुलांच्या संख्या कमी होते व उत्पादनात घट होते.
2) नवीन कोवळ्या पानांच्या शेंड्यावर पिवळसर ठिपके दिसून येतात.
कापूस
1) जुन्या पानांवर गंधकाची कमतरता लवकर दिसून येते. नवीन पाने पिवळी पात्याचा रंग लालसर दिसतो.
भुईमूग
1) गंधकाची कमतरता असल्यामुळे सर्वसाधारण झाडापेक्षा लहान झालेले आढळतात.
2) शेंगा व नत्रासाठी यांची वाढ खुंटते व परिपक्व होण्यास वेळ लागतो.
मका
1) नवीन पानांच्या शिरा पिवळ्या पडतात व पानांच्या कडा लालसर दिसतात.
2) पानांची कडा लालसर होऊन खोड खालच्या बाजूने लालसर होताना पिवळी पडतात.
कांदा
1) गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानाचा आकार लहान होतो. पाने पिवळी पडतात.
2) पानांची शेंडे पिवळसर पडून वाळतात.
तांदूळ
1) पाने पिवळसर होतात.
2) झाडांची वाढ खुंटते व लोंब्यांच्या संख्येत घट होते.
ज्वारी
1) झाडांची जुनी पाने पिवळसर हिरव्या रंगाची होतात. जुनी पाने हिरवीच राहतात.
2) झाडांची नवीन पाने लहान होऊन निमुळतात.

सोयाबीन
1) नवीन पाने हिरवट पिवळसर होतात व पानांची लोळी कमी होते.
2) गंधकाची जास्त कमतरता असल्यास पूर्ण झाड पिवळे होऊन परिपक्व होण्यापूर्वी ते गळून जातात. फुले कमी होऊन फळधारणा कमी होते.

ऊस
1) नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो.
2) गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात व वाढतात.
गहू
1) सर्वसाधारण पूर्ण झाड पिवळे पडते.
2) गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते. लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते व फुले कमी दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
गंधकामुळे तेलबियाणे पिकांमध्ये तेलाचे प्रमाण तसेच उत्पादनात वाढ होते. शेंगवर्गीय पिकामध्ये जैविक नत्र स्थिर करण्यासाठी गंधकाची मदत होते. उदा. सोयाबीनमध्ये गंधकाच्या उपयोगाने शेंगांच्या संख्येत व त्यांच्या वजनात वाढ होते. गंधकामुळे कडधान्य पिकांची प्रतीमध्ये वाढ होते. उसामध्ये साखरेचे प्रमाण वाढते.
जिप्सम मध्ये गंधकाचे प्रमाण  हे सर्वात जास्त असते. साधारणतः 13% ते 27% एवढे असते.
तसेच जिप्सम मध्ये कॅल्शियम सल्फेट – ६५% ते ७०%, कॅल्शिअम- 14% ते 16%,  सल्फर 14% ते 20% एवढे आहे.

 
Leave a comment