बळीराजासाठी ही फार महत्वाची बातमी, ‘या’ तारखेला मॉन्सून केरळमध्ये धडकणार

0

बळीराजासाठी ही फार महत्वाची बातमी हाती आली आहे. यंदा मॉन्सून केरळमध्ये १ जूनला धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानाकडून देण्यात आली आहे.

१ जून पासून मॉन्सून येणार असल्याने मान्सूनपूर्व शेतीच्या कामांना आता वेग येणार. सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्याच आठवड्यात केरळ येथे मान्सून दाखल होणार आहे. तर दुसरकीकडे १० जूनपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणार अशी माहिती देण्यात आली आहे.

त्यानंतर जवळपास १५ ते २० जून या दरम्यान उर्वरित महाराष्ट्र मान्सून दाखल होणारअसा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १५ मे आणि ३१ मे रोजी पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून अरबी समुद्रातील वादळामुळे महाराष्ट्रमध्ये मान्सून हा लांबणीवर पडला होता. मात्र यंदा अशी कोणतीही शक्यता नाही. त्यामुळे जर  केरळात मान्सून वेळेवर दाखल झाला तर महाराष्ट्रातही वेळेवर दाखल होण्याचा अंदाज विभागानाकडून देण्यात वर्तवण्यात आला आहे.

यंदा सरासरीच्या तुलनेत  ९८ टक्के इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटच्या माहितीनुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .६ मिमीच्या तुलनेत २०२१ मध्ये १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे.

 

Leave a comment