उन्हाळ्यात अननस खाण्याचे गुणकारी फायदे तुम्हला माहित आहे काय ?

0

उन्हाळ्यात आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्याने त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. मे महिन्याच्या कडक  उन्हात आपल्या रोजच्या आहारात संतुलित पदार्थांचा समावेश करणे खूप महत्वाचे आहे. उन्हाळ्यात अननस खाल्यास आपल्या शरीरास त्याच्या योग्य फायदा होतो. अननस या फळामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात अननस हे फळ खाल्यास शरीराला उर्जा मिळते.

अननस या फळामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येते. ज्यामुळे चेहऱ्यावर येणारे पिंपल्स जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरील डाग जाण्यासही मदत होते.

अननसमध्ये कॅल्शियम आणि मॅगनीज आढळून येतात जे आपल्या हाडांना मजबूत बनवण्याचे काम करते.  एका कपभर अननसमध्ये ७३ टक्के इतक्य प्रमाणात मॅगनीज आढळून येते. अननस व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत आहे. व्हिटॅमिन सी इन्फेक्शन पसरवणाऱ्या वायरसपासून लढण्यासाठी मदत करते.

अननसमध्ये ब्रोमेलॅन एंजाइम आढळून येते. त्यामुळे आपली पचनक्रिया सुरळित होण्यास मदत मिळते. अननसमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळून येते जे आपली डायजेशन सिस्टम दुरुस्त करते.

Leave a comment